Top Post Ad

गणेश देशमुख ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

गणेश देशमुख ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त



ठाणे


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठवड्यात मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल करण्यात आले होते. मुंबई परिसरातील अन्य महापालिकेत सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यांचा ठपका संबंधित महापालिका आयुक्तांवर ठेवला जात असल्याची चर्चा आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मुंबई महापालिकेनंतर आता ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गणेश देशमुख यांच्या जागी उल्हासनगरचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश देशमुख यांची ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर सुधाकर देशमुख यांची आता पनवेल महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.


याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त असलेले प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्याजागी इक्बाल चहल यांच्याकडे मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती  मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. उल्हासनगर, पनवेल, ठाणे येथे करोनाचे संकट गडद होत असताना स्थिती हाताळण्यात प्रशासन निकामी ठरत असल्याने हे पाऊल उचललं गेलं असल्याचे बोललं जात आहे.  बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी. उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची पनवेल महापालिका आयुक्तपदी, समीर उन्हाळे यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरून उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी. संजय हेरवाडे अतिरिक्त आयुक्त वसई विरार महापालिका यांची ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com