युनियन बँकेच्या वतीने गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

युनियन बँकेच्या वतीने गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

ठाणे


कोरोनाच्या पार्शवभूमीवर लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल होत आहेत हि बाबा लक्षात घेऊन ठाण्यातील गोकुळनगर  परिसरातील गरजू नागरिकांना युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे. बँकेच्या वतीने नागरिकांना एक महिना पुरेल इतक्या जीवनाश्यक वस्तूचे वाटप करून मदतीचा हात दिल्याने बँकेने "राष्ट्र के सेवा मे" हे आपले ब्रीद वाक्य खऱ्या सार्थ केल्याचे शिवसेना उपशहरप्रमुख जगदीश थोरात यांनी  सांगितले


शिवसेना उपशहरप्रमुख जगदीश थोरात यांच्या वतीने युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेला याबाबत सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. बँकेने देखील सामाजिक बांधीलकी जपत त्वरित हि विनंती मान्य केली व गोकुळ नगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेच्या वतीने गोकुळनगर, भवानीनगर,आझादनगर नं -२,रियाज चाळ आदी भागातील शेकडो गरजू व गरीब नागरिकांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले यावेळी बँकेचे उपमहाव्यवस्थापक कबीर भट्टाचार्य,बँकेचे मॅनेजर अशोक उपाध्याय,शिवसेना उपशहरप्रमुख जगदीश थोरात,शाखाप्रमुख सतीश पवार, महिला शाखाप्रमुख नंदा कोथले,उपविभागप्रमुख संतोष पाटील,उपशाखाप्रमुख गणेश पाडाळे,निलेश सोनावणे आदी सह बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA