ठाणेकरांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ व्हावी - आमदार प्रताप सरनाईक

ठाणेकरांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ व्हावी - आमदार प्रताप सरनाईक ठाणे  


कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावाला रोखण्यासाठी संपूर्ण देश 'लॉक डाऊन' करण्यात आला. यामुळे लोकांची दुकाने, उद्योग, व्यापार बंद आहेत. नोकरदार कामाला जावू शकत नाही. परिणामी त्यांना या महिन्यांचा पगार देखील मिळाला नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक श्रमिक वर्गाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अडचणी येत असल्याने काही लोक आपल्या मुळ गावी निघून गेले आहेत. अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांना घर कसे चालवायचे हा खुप मोठा प्रश्न पडला आहे त्यातच अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता पुढचे तीन ते चार महीने कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किमान पुढील तीन महिने तरी नागरिकांना काम धंद्यापासून लांब रहावे लागणार आहे. उत्पन्न नसल्यामुळे अन्नधान्य घेण्यासाठी पैसे नसणार तर ते पाणीपट्टी, घरपट्टी कसे भरणार या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील करदात्या नागरिकांना दिलासा द्यावा म्हणून पालिका हधीतील करदात्यांची या सन २०२०-२१ आर्थिक वर्षातील सहा महिन्यांची पाणीपट्टी, घरपट्टी पूर्णपणे माफ करण्यासंदर्भाचा विषय महासभेत चर्चेला घेवून आपण तात्काळ हा विषय मंजुर करावा.  अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्राद्वारे ठाणे महानगर पालिकेला केली आहे.


ठाणे महानगरपालिकेने करदात्यांना सहा महिन्यांचा कर माफ करण्याचा निर्णय घेतल्यास महानगरपालिकेला चालू वर्षात आर्थिक भार सहन करावा लागेल. तसेच पालिकेचे यावर्षीचे उत्पन्न सहाजिकच कमी होईल. त्याचा शहरातील विकासकामांवर परिणाम होणार नाही याचीही आपण काळजी घेवूया. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण सरकारकडून जे जे आर्थिक सहकार्य लागेल त्यासाठी पाठपुराव करुया. तसेच ठाणे शहरात ज्या हौसिंग सोसायटया आहेत त्या सर्व हौसिंग सोसायटयांनी आपापल्या इमारतीमधील रहिवाशांचा सहा महिन्यांच्या कालावधीचा 'मेंटेनन्स' सुद्धा माफ केला पाहिजे, याबाबत महानगरपालिकेने सर्व हौसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करावे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीचे नागरिकांवर संकट आले आहे. आता नागरिक संकटात असताना त्यांना आपण साथ देणे गरजेचे आहे. तसेच आपण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जे काम करत आहात हे प्रशसनीय आहेच त्यामुळे ही करमाफी देवून नागरिकांना दिलासा द्यावा. अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad