Trending

6/recent/ticker-posts

पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी ठाण्यात आगरी ऑल इन वनचा पुढाकार

पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी ठाण्यात आगरी ऑल इन वनचा पुढाकार


ठाणे:


कोरोना लॉकडाउन १७  मे  पर्यंत वाढला असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या जागतिक आपत्ती मुळे सर्व सामान्य कलाकारांवर देखील उपासमारीची वेळ सुरु झाली आहे  पहिल्यांदाच  कलाकारांचा सीझन वाया जात आहेकार्यक्रम रद्द होत आहेत, इवेंट ,नाटकांचे शोसिरीयलसिनेमांचे शुटिंग पुर्णतः बंद झाले आहे. हाताला काम नाही कधी सुरु होणारपुढे काम मिळेल की नाही याची शास्वती नाही.  पडद्यामागील कलाकार बॅकस्टेज आर्टिस्ट ,प्रॉपर्टी बॉइजमेक अप सहाय्यकड्रेसबॉयस्पॉट बॉइजसेटिंग बॉइजतंत्रज्ञ रंगमंच कलाकारनृत्य कलाकारसर्व बॅकस्टेज आर्टिस्टतंत्रज्ञ यांना काही ठिकाणी पर डे पेमेंट मिळत होते पण आज सर्व शो शुटिंग बंद असल्यामुळे या मंडळींना कठीण परिस्थितीतून जावं लागतं आहे. कलाकार आर्थिक दृष्ट्या संकटात आले असून त्यांची मासिक मिळकत बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना रोजचे जीवन जगण्यासाठी आवश्यक गरजा भागवण्यासाठी कुटुंबीय संकटात आले आहे. 
शहरातील कलाकारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून कलाकारांच्या  मदतीसाठी आगरी ऑल इन वन या सामाजिक संस्था  व आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे प्रसिद्धी प्रमुखएक प्रथितयश सिनेनाट्य कलाकार.मयुरेश कोटकर हे पुढाकार घेत आहेत. ठाण्यातील बँकस्टेज आर्टिस्टप्रॉपर्टी बॉइजमेक अप सहाय्यकड्रेसबॉयस्पॉट बॉइजसेटिंग बॉइजतंत्रज्ञ रंगमंच कलाकारनृत्य कलाकारसर्व बॅकस्टेज आर्टिस्टतंत्रज्ञ आणि यांना आपल्या आगरी ऑल इन वन या सामाजिक संस्थे तर्फे जीवनावश्यक किराणा वस्तू तांदुळगहुसाखरतेलतिखट-मीठ इत्यादी साहित्य वस्तू घरपोच पोचवत आहेत. शासनाचे सर्व नियम पाळुन ही सेवा पुरवली जात आहे.


मयुरेश कोटकर यांच आता संगीत संत तुकाराम हे नाटक सुरू होते .आतापर्यंत अनेक सिरीयलसिनेमाआणि २५ हुन अधिक व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलेले अनेक वर्षे अनेक संस्थांन मधुन वेगवेगळ्या नाटकात काम केल्यामुळे मयुरेशने नाटक क्षेत्रातील अनेक बारकावे आणि बरेवाईट दिवस जवळून  पाहिलेले आहेत. त्यामुळे या  परिस्थितीची जाणिव लक्षात घेऊन स्वखर्चाने मदतीचं कार्य सुरू केलं आहे. ठाणे भिवंडी या परिसरात कलाकार मंडळी मोठ्याप्रमाणात राहत आहेत. मयुरेश कोटकर यांच्या या कार्यात त्यांची पत्नी स्नेहल आणि आई-बाबांभाऊ तसेच मित्र.प्रथमेश सावंतआणि त्यांची आगरी ऑल इन वन या संस्थेचे सर्व पदाधिकारीतसेच आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे .. एक कलाकारच कलाकारांच्या मदतीला धावून येउ शकतो अश्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


  Post a Comment

0 Comments