लाखो कोटींच्या पॅकेजची घोषणा होते, पण आत काहीच नसतं- मुख्यमंत्री

लाखो कोटींच्या पॅकेजची घोषणा होते, पण आत काहीच नसतं- मुख्यमंत्री


मुंबई :


  मुंबई


आतापर्यंत बरीच पॅकेज देण्यात आली, पण पोहोचली किती? लाखो कोटींच्या पॅकेजची घोषणा होते. दिसायला हे पॅकेज चांगलं दिसतं, पण आत काहीच नसतं, पंतप्रधानांच्या पॅकेजवर मुख्यमंत्र्यांनी आज अप्रत्यक्ष टोला मारला. तसंच केंद्राकडून येणारा निधी अजून आलेला नाही. कोरोनाला रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याच्या आरोप करत भाजपने आंदोलन केलं, यावरही मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. कोणीही राजकारण करू नये तुम्ही राजकारण केलंत म्हणून आम्ही राजकारण करणार नाही. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. तुम्ही काहीही बोला, आम्ही प्रामणिकपणे काम करतोय,  पंतप्रधान मोदींनी केलेल्या पॅकजची घोषणा, राज्यात भाजपने केलेली पॅकजची मागणी आणि राज्यातल्या राजकारणावर त्यांनी आज निशाणा साधला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेशी संवाद साधला.


फक्त पॅकेज देऊन भागणार नाही, पॅकेजपेक्षाही प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. रेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना धान्य दिलं, शिवभोजनच्या माध्यमातूनही भोजन देत आहोत. आरोग्य सुविधा देत आहोत. तसंच लाखो मजुरांच्या खाण्याची सोय केली, तसंच अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवलं, हे पॅकेजपेक्षा कमी नाही, असं म्हणत राज्यामध्ये विरोधी पक्ष असलेला भाजपच्या पॅकेजची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी धुडकावून लावली आहे. फक्त राजकारण म्हणून राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेसे नाही आहे. मी महाराष्ट्र जपतो, महाराष्ट्राची संस्कृती जपतो, महाराष्ट्राचे संस्कार जपतो म्हणून माझ्या संस्कारात या अडचणीच्या वेळेला राजकारण करणे बसत नाही, मी राजकारण करणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.


मार्च-एप्रिलपासून कोरोना संकट सुरु झाले. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढले, कोरोनासोबत जगायला शिका, हे मी सांगतो आहे, शिंकताना काळजी घ्या वगैरे उपाय करावे लागतील. आता गुणाकार जीवघेणा होणार, केसेस वाढणार आहेत. बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु केली आहेत. आपल्याकडे जवळपास 7 हजार बेड्स उपलब्ध आहेत. पुढच्या महिन्यात 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध राहतील.


होळीनंतर कोरोनाची बोंबाबोंब सुरू झाली. ही परिस्थिती अनपेक्षित आणि कोणाच्याही ध्यानी मनी नसलेली आहे. सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येता घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad