शिष्यवृत्ती येत्या सहा दिवसात खात्यात जमा होणार
कोरोनाच्या काळात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या  हक्कांच्या शिष्यवृत्ती येत्या सहा दिवसात खात्यात मिळणार 

 


 

ठाणे

 

गेले कित्येक दिवस विद्यार्थी भारती संघटना कोरोनाच्या काळात अडकलेल्या विद्यार्थ्यांची हक्कांची  शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करत होती .आज ती मागणी पूर्ण झाली आहे. त्याबद्दल  विद्यार्थी भारती संघटनेने  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहे.  एका निर्णयामुळे अनेक कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल ,

 1 लाख 97 हजार 16 विद्यार्थ्यांना येत्या 6 दिवसांत हक्काची स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या  खात्यात जमा होणार असल्याचे असे मत विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी मांडले. अनेक विद्यार्थ्यांनची फी न भरलेली असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे निकाल देखील अडवले गेले आहे त्यामुळे ह्यास देखील हातभार लागू शकतो असे मत राज्यकार्यवाह श्रेया निकाळजे यांनी मांडले.


 

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या