एकाधिकारशाहीने वागणाऱ्या शहापुर तहसिलदारांची तात्काळ बदली करण्याची मागणी

एकाधिकारशाहीने वागणाऱ्या शहापुर तहसिलदारांची तात्काळ बदली करण्याची मागणी


आमदार दौलत दरोडा यांचे उपमुख्यमंत्री आणि  महसूल मंत्र्यांना लेखी निवेदन


 शहापूर 


शहापुर सारख्या दुर्गम तालुक्यात कोविड-१९चे ११ रुग्ण बाधित असतांना यासाठी  स्थानिक आमदार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्याशी योग्य समन्वय न ठेवता आपल्या एकाधिकार शाहीचा वापर करणाऱ्या शहापूरच्या तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निलीमा सुर्यवंशी यांची तत्काळ बदली करावी अशी मागणी आमदार दौलत दरोडा यांनी राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदारांच्या या बदलीचे  निवेदन दरोडा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील दिले आहे .


तहसिलदार  या आपत्ती व्यवस्थापन प्रमुख असतांना  शहापुर येथे मुख्यालयी  न  राहता ठाणे येथून ये-जा करीत आहेत, महसुलचे तलाठी, मंडळ अधिकारी गायब आहेत. कर्मचारी आणि इतर अधिकाऱ्यांशी सौजन्याने न वागणे, गौण खनिज वसुलीच्या नावे स्वताचा आर्थिक फायदा करून घेणे, कोविड-१९शी लढतांना आपत्ती व्यवस्थापन टीम म्हणून इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात न घेणे,कोणत्याही प्रकारे खर्च ,मदत ,देणगी याबाबत आणि कोरोनासंबंधी  उपचार आणि उपाय याबाबत स्थानिक प्रसारमाध्यमांना  अधिकृत माहिती न देणे,शेतक-यांची पीक विमा योजना न राबवणे,शासनाच्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या हरकतींचे दावे निकाली न काढणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी जनतेने आमदार दौलत दरोडा यांच्याकडे केल्या होत्या. वरील बाबी तसेच कोविड-१९ चा शहापूर तालुक्यात वाढता धोका लक्षात घेता तहसिलदार यांची शहापुर येथुन तत्काळ बदली करावी अशी मागणी आमदार  दरोडा यांनी केली आहे. 


 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA