Top Post Ad

...म्हणून अरुण जेठलीनी डॉ.रघुराम राजन यांना गव्हर्नर पदावरून काढले

नमस्कार बंधू-भगिनीनो


आणि माझ्या यंगस्टार युवक-यवतीनो


मी कुठल्याही राज्यकर्त्यावर, सरकारवर किंवा पक्षावर टिका करीत नाही,आणि मी कुठल्याही पक्षाचा नाही,जी मी खाली माहिती देत आहे ती माझ्या आडतीस वर्षे तीन महिन्याचा अनुभव मांडत आहे,तरी देखील कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमा असावी.
मी रिझर्व्ह बँकेत लागलो तेव्हा डिप म्हणजे DEAP (Department of Economic Analysis & Policy)या विभागात सहा वर्षे काम केले,तसे म्हटले तर १९८०च्या दशकात वीस-बावीस डिपार्टमेंट होती,परंतु बँकेचे हदय (Heart)जर म्हटले तर वरील असणारे डिपार्टमेंट,(2)IDMD(Internal Debt Management Deptt.म्हणजे आंतरिक ऋण प्रबंध विभाग या विभागात सेक्शन Central govt.Loan State govt.Loan,Open market operation, wage&Means,PDRS इत्यादी सेक्शन्स आहेत (3)DEIO,(4)DBR- Deptt.of Banking Regulation(5)PDO- Public Debt Office(6)MPD- Monetary Policy  Deptt.ही जी सहा डिपार्टमेंट आहेत हि अक्षरशःआरबी आयचे हदय आहे,त्यापैकी दुसरे आहे तिथे तर मी तेरा वर्षे काम केले,माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधीचे १९८४ ला निधन झाले,


त्यानंतर देशाची चक्रेच बदलली,ताबडतोब नवख्या राजीव गांधीना प्रधानमंत्री बनवले,परंतु राजीव गांधीना यांच्यातला काहीच अनुभव नव्हता,परंतु राजीव गांधींची दूरदृष्टी म्हणा किंवा आणखी काही म्हणा आपल्याकडे एक खणखणीत नाणे आहे आपण त्या नाण्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा आणि ते नाणे म्हणजे डॉ.मनमोहन सिंह जे आरबीआयचे त्यावेळचे गव्हर्नर होते, त्यावेळी देशाची आर्थिक स्थितीच खुप बिकट होती त्यावेळी रुपयापेक्षा डॉलरची किंमत वाढली होती राजीव गांधी नवखे प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते,त्यांनी क्षणाचा विलंब न लावता देशावर आलेले संकट घालवण्यासाठी तेव्हाचे गवर्नर डॉ.मनमोहन सिंह यांच्या हातात सूत्रे दिलीत त्यावेळी मी माझे पहिले डिपार्टमेंट DEAP या डिपार्टमेंट मध्ये डॉ.नरेंद्र जाधव (मी आणि माझा बाप हे पुस्तक लिखित)हे अर्थतज्ञ मॅनेजर या पदावर होते गव्हर्नर साहेबांनी त्यांना या जबाबदारी साठी टिम बनवायला सांगितले,जाधव साहेबांनी आमच्या विभागा मधील काही निवडक लोकांना घेतले त्यामध्ये ऑफिसर्स,टायपिस्ट,क्लार्क, स्टनो,शिपाई अशांची निवड केली,या टिममध्ये मी देखील होतो दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता ताजमहल हॉटेलच्या कॉन्फरंन्स रुममध्ये आर्थिक घडीसाठी सुधारण्यासाठी कामाला सुरूवात झाली, दुपारी दोन वाजेपर्यंत तिढा सुटत नव्हता,सिंह साहेब खूप टेंशनमध्ये असायचे कारण फायनांस मिनिस्टरचे सतत फोन येत होते,साडतीन वाजता शेवटी गव्हर्नर साहेब जाधव साहेबांना म्हणाले अरे भाई कुछ तो करो उपरसे फोन आ रहें है,जाधव साहेबांवर जबाबदारी आल्यावर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत द प्रॉब्लेम ऑफ द रूपी या पुस्तकामधील काही पॅरा गव्हर्नर साहेबांना दाखवला,आरे भाई यही तो हमें चाहिए,आणि आमच्या कामाला यश आले देशाचा एका पॅराग्राफममुळे पेच सुटला याला म्हणतात देशाच्या प्रधानांमंत्र्याची दूरदृष्टीत्यानंतर पुढे नरेंद्र साहेबांना देखील देशाची आर्थिक निवडीसाठी नेमणूक केली आणि गव्हर्नर साहेबांना १९९१ मध्ये फायनांस मिनिस्टर बनविले,त्यानंतर परत एकदा ९१ मध्ये देशाची घडी विस्कटली,त्यावेळेस डॉ.मनमोहन सिंह फायनान्स मिनिस्टर होते,बंधूनो आपणांस माहित आहे का! देशाच्या बँकेचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिजर्व बँक का नाव ठेवले, कारण आपल्या देशावर कितीही संकट येवो,मग ती महामारी असो,युध्द असो, भूकंप वादळ असो आपल्याकडे तेवढाच रिजर्व मनी (पैसा)असतो मग तो करंसीच्या स्वरूपात असो,किंवा सोन्याच्या स्वरुपात असो आपल्याकडे रिझर्व्ह सोने तीन ठिकाणी आहे ते म्हणजे फोर्ट मुंबई,त्याहीपेक्षा नागपूर, त्याहीपेक्षा इंग्लंड या ठिकाणी देशाचे सोने आहे ते हे संकटसमयी वापरले जाते, आणि ९१ ला अशीच परिस्थिती परत एकदा सरकारवर ओढवली होती,आणि हेच सोने गहाण ठेऊन डॉ.मनमोहन सिंह यांनी देशाची आर्थिक स्थिती सुधरवली, नंतर हेच सोने सोडवून परत रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत ठेवले,९१ नंतर देशाने २०१३ पर्यंत कधीच मागे वळून पाहिले नाही, त्यानंतर २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन होते,


चौदामध्ये मी पीडीओ (PDO)Public Debt Office या डिपार्टमेंट मध्ये माझी बदली झाली होती, मला नवीन नवीन डिपार्टमेंची काम समजून घेण्याची खूप आवड होती मला सोने तारण,आणि सेक्युरिटी बॉन्ड (Security Bond)चा डेस्क मीळाला,नवीन डेस्क असल्यामुळे कामाचा अनुभव समजून घेतला तेव्हा माझ्या लक्षात आले की, रिजर्व बँकेकडे आणखी एक असे डिपार्टमेंट आहे ते म्हणजे पी डी ओ,मित्रहो,या डिपिर्टमेंटची ख्याती अशी आहे की हा एक्स्ट्रामनी आहे,तो समजावून सांगतो,पुर्वी १९४९ ला आरबीआय ओपन झाली त्यावेळेस लोकांकडे खुप सोने होते म्हणजे त्यावेळेच्या तीन वर्षाच्या मुलाच्या नावे कुणी दहा किलो, कुणी पंचवीस किलो सोने तर कुणी बायकोच्या,बहिणीच्या, भावाच्या नावाने असंख्य टन सोने,त्याचप्रमाणे सेक्युरिटी बॉन्ड असा अब्जावधी पैसा व सोने पडुन आहे,त्याला कोणी वारस नाही हा देखील एक्स्ट्रा पैसा जो देशाच्या संकट समयी उपयोगात येऊ शकतो आणि आरबीआय कडे सुरक्षित आहे,या पैशावर कुठल्याही सरकारचा अधिकार नाही म्हणून जेव्हा जेव्हा देश डबघाईला गेला तेव्हा अगोदरच्या सरकारने कधीही या पैशाची मागणी केली नाही, *पण २०१४ मध्ये त्यावेळचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यानी डॉ.रघुराम राजन यांना फोन करून सांगितले की हा वेस्टेड मनी आमच्या ताब्यात द्या म्हणजे पीडिओ डिपार्टमेंट आमच्या ताब्यात द्या*, *स्टेटफॉरवर्ड डॉ.रघुराम राजनच ते,त्यांनी मागचा पुढचा विचार न करता ठणकाऊन सांगितले पीडीओ काय मांगता अख्खी आरबीआय ताब्यात घ्या*, *याचा राग येऊन जेठलीने डॉ.रघुराम राजन यांना गव्हर्नर पदावरून काढले व डॉ.उर्जित पटेल यांना गव्हर्नर बनवले*, *नंतर २०१६ मध्ये नोटबंदी अचानक आणली गेली* आणि परत एकदा देशाचे कंबरडे मोडले, याच्यामध्ये आपले नाव खराब होऊ नये म्हणून उर्जित पटेल यांनी आपला तडकापडकी राजीनामा दिला,त्यानंतर दास नावाचा ना अर्थतज्ञ ना बँकेची माहिती असणारा इतिहास शिकलेला गव्हर्नर आणून बसवला आणि पुढे देशाची आर्थिक स्थिती कशी आहे ते तुम्हाला सांगायला नको,


अगदी अलिकडेच राहुल गांधीने डॉ.रघुराम राजन यांना फोन केला की देशाची आर्थिक स्थितीच बिकट असतांना काय पाऊले उचलावी लागतील,रघुराम राजन यांनी इतके मार्मिक उत्तर दिले ते म्हणजे *आपल्या देशाची लोकसंख्या १३५ करोड आहे*,*गरीबांची म्हणजे ज्यांची बिकट परिस्थिती आहे आशांची संख्या जरी ८० करोड पकडली* तरी आता सध्या आपल्या कडे *१६८ करोड रिजर्व पैसा* आहे तर त्यातील *८० करोड* लोकांसाठी खर्च करायला काही हरकत नाही, मित्र हो आता पक्ष,नेता,जातीभेद हे मुद्दे बाजूला ठेवून डॉ. मनमोहन सिंह, डॉ.रघुराम राजन, डॉ.नरेंद्र जाधव अशा अर्थतज्ञांची देशाला गरज आहे, कारण देशाच्या आर्थिक स्थितीची नाडी,व आरबीआय च्या कामाचा अनुभव यांच्याकडे प्रचंड आहे, आताच्या सरकारने यांचा ॲडवाइज घेतला तर त्याच्यातून काहीतरी मार्ग सापडेल नाहीतर २० वर्षे देश मागे गेल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे,आताच कंपन्या डबघाईला आल्या आहेत परत लोकांना कामावर घेतील याची शास्वती नाही,रतन टाटासारख्या माणसाने भाकित केले आहे,स्वत:च्या कमगार लोकांना सांगितले *२०२३* पर्यंत तुमची नोकरी राहू शकत नाही याच्यातच सर्व काही समजून जावे.


     *गौतम रामचंद्र सावंत*
आरबीआय रिटायर्ड एमप्लॉयी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com