Top Post Ad

भातसा धरणात मागील वर्षापेक्षा पाण्याच्या पातळीत ८.२९ टक्के वाढ

मुंबईची तहान भागवणाऱ्या भातसा धरणाची पातळी वाढल्याने मुंबईकरांचे पाणी संकट टळणार

 

मागील वर्षापेक्षा पाण्याच्या पातळीत ८.२९ टक्के वाढ

 


 

शहापूर

 

मुंबईला दररोज पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पातळी वाढल्याने मुंबईकरांना या वर्षी पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नसून त्यांना पाणी संकटाला तोंड द्यावे लागणार नसल्याचे चिन्ह दिसत आहे. चालू वर्षी चांगला पाऊस झाल्याने भातसा धरणात जास्त पाणी साठा आहे. एप्रिल उलटून मे महिना संपत आला तरी  धरणाच्या पाण्याची पातळी चांगली आहे. गुरुवार दिनांक २८ मे २०२० रोजी  प्रतिनिधीने भातसा प्रकल्प अधिकाऱ्यांशी  संपर्क केला असता २८ मे २०१९ च्या तुलनेत आजची पाण्याची पातळी ८.२९ टक्के ने वाढल्याची  अधिकृत माहिती समोर आली आहे. 

 

               ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या भातसा धरणातून प्रतिदीन  २००० एमएलडी पाणी मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९  मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्ष घनमिटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चोरस किलोमिटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमिटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमिटर आहे.  गेल्या वर्षी भातसा धरण क्षेत्रात एकूण २०९२.०० मिली मीटर पर्जन्यमान झाले होते. त्यावेळी  धरणाच्या पाण्याची पातळी १०९.१३ मीटर होती. पाणी साठा २७९.९८१ दश लक्ष घण मीटर होता. तर यावर्षी चांगल्या पावसामुळे हे पर्जन्यमान ४३२७ एवढे झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी आज मितीस १४१.५१ मीटर झाली आहे.  तर पाणी साठा ३५८.१२५ दश लक्ष घण मीटर झाला असल्याने हे प्रमाण गेल्या वर्षा पेक्षा ८.२९ टक्क्यांनी वाढले  आहे. त्यामुळे चालू वर्षी मुंबईकरांना पाणी संकट भेडसावणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com