Trending

6/recent/ticker-posts

श्रमजीवी संघटनेचे तहसील कार्यालयासमोर हक्काग्रह आंदोलन 

श्रमजीवी संघटनेचे तहसील कार्यालयासमोर हक्काग्रह आंदोलन 

 

शहापूर 

 

 आदिवासींना रेशन कार्ड व जीवनावश्यक वस्तू  मिळाव्यात यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने २६ मे पासून शहापूर तहसील कार्यालयासमोर हक्काग्रह आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र म्हसकर हे करत आहेत. सदर आंदोलन गुरुवारी देखील सुरू ठेवण्यात आले होते हे आंदोलन शासनाच्या नियमांचे कटकोरपणे पालन करत फिजिकल डिस्टन्स ठेऊन सुरू आहे. 

 

१.शासनाने कोर्टात दिलेल्या हमीपत्राची आंबलबजावणी करावी. २. आदिवासींना विनाविलंब रेशनकार्ड द्यावेत. ३. विभक्त रेशनकार्ड देण्यात यावेत. ४. या सर्व नवीन रेशनकार्ड धारकांना धान्य देण्याचे आदेश द्यावेत. ५. मागणी केलेल्या मजुरांना तात्काळ रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करावीत. या मागण्यांसाठी पालघर, ठाणे, नाशिक, रायगड या जिल्ह्यतील सर्व तहसील कार्यासमोर  श्रमजिवी संघटनेचे धोरणात्मक आंदोलन सुरू आहे.

 


 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या