ठाण्यातील इंदिरानगर रुपादेवी मैदान बनले डम्पिंग ग्राऊंड  

ठाण्यातील इंदिरानगर रुपादेवी मैदान बनले डम्पिंग ग्राऊंड  ठाणे 
लॉकडाऊन काळात इंदिरानगर रुपादेवी मैदान येथे  गटरामधील चिखल टाकण्यात येत आहे. कंत्राटदाराने या ठिकाणी चिखल टाकण्यास सांगितले असल्याचे सफाई कर्मचारी सांगत आहेत. यामुळे सदर परिसराला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप आले आहे. येथे डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. चिखलामध्ये तोंड खुपसून ते त्याच अवस्थेत इकडे तिकडे मैदानामध्ये फिरतात, लहान मुले नजर चुकून मैदानामध्ये खेळायला येतात, तेही या चिखलामध्ये हात घालतात. त्यामुळे साथीच्या रोगाचा आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 
येथील कचराही बरेच दिवस पडून राहत असल्यामुळे, ज्या दिवशी गाडी येत नाही, त्यादिवशी तिथेच पुन्हा कचरा टाकतात  हा चिखल मातीवर टाकण्यात काय हरकत आहे, असे विचारले असता, तुम्ही आम्हाला कोण सांगणार, आमच्या साहेबांशी फोनवर बोला अशी धमकी देतात. स्थानिक नगरसेवकांचे कंत्राटदाराशी आर्थिक साटेलोटे असल्यानेच हा प्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  
नालेसफाईचे काम चालू आहे त्याच प्रकारे रूपा देवी मैदानामध्ये काही सरकारी कामानिमित्त तेथे जमिनीचे उत्खनन करून उत्खननातील माती तेथे मोठा ढिगारा उभा झाला आहे काही दिवसात पाऊस येऊन ठेपला आहे पावसाळ्यामध्ये हीच माती ओली होऊन उत्खनन झालेल्या खड्ड्यामध्ये वापस जाईल त्यामुळे आरोग्य बाबतीत समस्या उद्भवतील म्हणून ठाणे महानगर पालिकेच्या अधिक्रायांनी येथे लक्ष घालून योग्य ते पाऊल उचलावे. अशी मागणी होत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या