Trending

6/recent/ticker-posts

धार्मिक स्थळांचा पैसा हा सरकारचा पैसा आहे- प्रकाश आंबेडकर

धार्मिक स्थळांचा पैसा हा सरकारचा पैसा आहे- प्रकाश आंबेडकर



पुणे 


धार्मिक स्थळांचा पैसा हा सरकारचा पैसा आहे आणि देशातील धार्मिक स्थळे ही सरकारची आहेत. त्यामुळे सरकारने हिम्मत दाखवून धार्मिक स्थळांकडचा सर्व पैसा ताब्यात घेऊन लोकहितार्थ त्याचा वापर करावा, कोरोनाने कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. गरीब आणि मजूर वर्गाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांकडे जो पैसा आहे तो गरीब माणसांच्या उपजीविकेसाठी खर्च करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती, यात अनेक मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात वंचित बहुजन आघाडी सामील असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. केंद्र सरकारने नुकतीच पॅकेजची घोषणा केली आहे, हे पॅकेज खोटे, फसवे आहे. केंद्राचं पॅकेज म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचा भात असल्याची टीका प्रकाश त्यांनी केली. तसंच भारतात कोरोना येण्याला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं आहे.


Post a Comment

0 Comments