महाराष्ट्र काँग्रेसने उचलला ४६२७ गरजू स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाचा खर्च

महाराष्ट्र काँग्रेसने उचलला ४६२७ गरजू स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाचा खर्च 


मुंबई


  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार गेल्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या  विविध भागातून आपल्या राज्यात परतणाऱ्या 4627 गरजू स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाचा खर्च @INCMaharashtra ने उचलला आहे. नागपूर ते मुज्जफरपूर आणि वर्धा ते  पाटणा या रेल्वेतून प्रवास करणा-या सर्व 2019 मजूरांच्या तिकीटाचा खर्च काँग्रेस पक्षाने केला. ऊर्जामंत्री मंत्री नितीन राऊत, पशुसंंवर्धन मंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे यांचे याबद्दल विशेष अभिनंदन होत आहे.


पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीने 239 स्थलांतरित मजूरांची पाटणा येथे जाण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली.याशिवाय स्थलांतरित मजुरांच्या आरोग्याची तपासणी, त्यांचा फॉर्म भरण्यास मदत, त्यांना प्रवासादरम्यान पाणी, जेवण, सॅनिटायझर, मास्क आदी गोष्टींचीही उपलब्धता काँग्रेसकडून करण्यात येते आहे. स्थलांतरित मजुरांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून प्रत्येक जिल्हानिहाय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA