Trending

6/recent/ticker-posts

विजय फाऊंडेशनतर्फे पोलिसांना हॅन्ड फ्री सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप
ठाणे शहरातील पोलीस कार्यालयांना विजय फाऊंडेशनच्या वतीने हॅन्ड फ्री सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप

 


 

ठाणे

महाराष्ट्राबरोबर ठाणे शहारात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे . रात्रंदिवस या युद्धात झटत असणारे पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी आपले कर्तव्य बजावत आहेत या दरम्यान काहींना कोरोनाची बाधा होऊन आपले प्राणही गमवावे लागले आहेत.हि बाब लक्षात घेऊन पोलिसांच्या सुरक्षतेची काळजी घेत ठाण्यातील विजय फाऊंडेशन या संस्थेने संस्थापक विराज कदम यांच्या माध्यमातून ठाणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन,सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय,सर्व झोनचे उपायुक्त कार्यालय यांना आधुनिक पद्धतीच्या हॅन्ड फ्री सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप करण्यात आले आहे. 

या कोरोना महामारीत पोलीस हे आपल्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. या दरम्यान काही पोलिसांना आपले प्राण देखील गमवावे लागले. त्यामुळे आपल्यासाठी झाडणाऱ्या या पोलिसांची आपणच काळजी घेतली पाहिजे या हेतूने आम्ही विजय फाऊंडेशनच्या माध्यमातून हॅन्ड फ्री सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप केल्याचे फाउंडेशनचे संस्थापक विराज कदम यांनी यावेळी सांगितले


 

  

Post a Comment

0 Comments