ठामपाच्या मोफत उपचाराच्या धोरणात्मक निर्णयाबाबत खाजगी रुग्णालये अनाभिज्ञ

ठाणे महापालिकेच्या मोफत उपचाराच्या  धोरणात्मक निर्णयाबाबत रुग्णालयेच अनाभिज्ञ


       ठाणे


कौशल्य, सफायर आणि वेदांत रुग्णालयांमध्ये केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना कोरोनाचे मोफत उपचार केले जातील, असे ठाणे महानगर पालिकेच्या वतीने बुधवारी जाहीर करण्यात आले होते. मात्र, या बाबत रुग्णालयच अनभिज्ञ असल्याचा प्रकार काँग्रेसच्या ओबीसी सेलचे ठाणे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी उघडकीस आणला आहे. 


 ठाणे शहरामधील होरायझन प्राईम, सफायर, कौशल्या आणि वेदांत हॅास्पीटलमध्ये कोव्हीड 19 बाधित गरीब गरजू नागरिकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे.   या रुग्णालयात गरजू व वंचितांना मोफत कोविड -19 उपचार मोफत दिले जाणार आहेत. शहरातील कोव्हीड बाधित गरीब नागरिकांना सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत दाखल केले जाणार आहे.


या योजनेंतर्गत उच्च प्रतीचे उपचार, अत्याधुनिक सुविधा व पौष्टिक जेवण सर्व रूग्णांना विनामूल्य उपलब्ध देण्यात येणार आहे, असे ठाणे माहनगर पालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, ठाणे पालिकेच्या या निर्णयाची कौशल्य रुग्णालयाला माहितीच नसल्याचे राहुल पिंगळे यांनी सदर रुग्णालयाला केलेल्या फोनमुळे उघडकीस आले आहे. या संदर्भात त्यांनी ठाणे पालिका आयुक्त सिंघल यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे. 


पिंगळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार,   ठाणे महानगरपालिकेने होरायझन, सफायर, वेदांत आणि कौशल्या हॉस्पिटलमध्ये covid-19 बाधित गरीब गरजू नागरिकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा जाहीर करण्यात आलेली असताना कौशल्य हॉस्पिटल यांना याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही माहिती प्राप्त नसल्याचे निदर्शनास आले आहे.  त्यामुळे या रुग्णालयांमध्ये  दिलेल्या योजनांसाठी किती बेड उपलब्ध असतील तसेच वर दिलेल्या योजनेअंतर्गत किती रुग्ण  उपचार घेऊन घरी जात आहेत व किती बेड रिक्त होत आहेत याची माहिती लोकांसाठी जाहीर करावी, अशी मागणीही पिंगळे यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad