Trending

6/recent/ticker-posts

शेताच्या बांधावर खते व बियाणे वाटप मोहीम


शेताच्या बांधावर खते व बियाणे वाटप मोहीम

 


 

कल्याण

      

COVID-19 च्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषि सेवा केंद्रावर खते व बियाणे खरेदी करण्या करिता घराच्या बाहेर पडण्याची वेळ येऊ नये तसेच कृषी सेवा केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे  करोना चा प्रसार टाळण्याकरिता  बांधावर खते व बियाणे वाटप मोहीम सुरू केली आहे.

     कल्याण तालुक्यातील निंबवली, वासुंद्री, गुरवली, वेहळे, नडगाव, फळेगाव,रुंदे या गावातील बचत गट , ग्राम संघ व कृषि विभाग यांच्या पुढाकाराने कृषि सेवा केंद्रा बरोबर नियोजन करून गावात लागणारे भात बियाणे गावातच उपलब्ध करून देण्यात आले.त्यामुळे शेतकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

  सदरची मोहीम इतर गावात सुद्धा  नियोजित केलेली आहे. असे कृषि सहाय्यक  विवेक  दोंदे यांनी बोलताना  सांगितले. या करिता क्षेत्रीय  स्तरावरील कृषि सहाय्यक, कृषि सेवा केंद्र,गावातील ग्रामसंघ,बचत गट,कृषि सखी यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.


 

  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या