जव्हारच्या मंडप डेकोरेटर व्यावसायिकांची आर्थिक मदतीची मागणी
जव्हार :
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व सामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यातच आता छोट्या-मोठ्या कार्यक्रमांवर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो अशा मंडप व्यावसायिकानाही यंदा मात्र, मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आमचे व्यवसाय बारमाही नाहीत. पावसाळ्याचे चार महिने तर नुसते घरी बसून काढावे लागतात.शासनाने जशी इतर व्यावसायिकांना, मजुरांना आर्थिक मदत केली आहे, तशीच आम्हा मंडप व्यापा यांनाही करावी अशी मागणी जव्हारच्या मंडप डेकोरेटर व्यावसायिकांनी एकत्र येऊन शासनाकडे केली आहे.
जव्हारमध्ये नऊ ते दहा छोटेमोठे व्यापारी आहेत. त्यांना यंदा प्रत्येकी दोन ते तीन लाखांच्या आर्डर होत्या. मात्र, सामूहिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने आणि हा काळ लवकर संपण्याची चिन्हे नसल्याने शासनाने आमचा विचार करावा, जेणेकरून आम्ही कुटुंबाची काळजी घेऊ शकू, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या सीझनवर वर्षभर कुटुंब चालते. मात्र नेमक्या याच कालावधीत लॉकडाऊन झाले. यामुळे आता वर्षभर आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याची चिंता सतावत आहे. यंदा झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने मंडप व्यापाऱ्यांनाही मदत करावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती मिळाली. मार्चपासून ते जूनपर्यंत लग्नाच्या, साखरपुडा, हळदीच्या, रिसेप्शनचे अनेक कार्यक्रम असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कार्यक्रम रद्द तरी झाले किंवा घरगुती साजरे झाले. मात्र, बुकिंग रद्द झाल्याने मंडप व्यापा यांची मोठीच अडचण झाली आहे. हे व्यापारी वर्षभर या सीझनची आतुरतेने वाट बघत असतात.
वर्षभराचा गाडा हाकण्यासाठी वर्षातील हे तीन - चार महिने त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. यावर्षी सगळेच गणित चुकले. एरवी लग्नसराईत फुरसत नसणा या मंडप व्यापा यांना यंदा मोठा फटका याना बसला आहे. जव्हारमध्ये नऊ ते दहा छोटे मोठे व्यापारी आहेत, त्यांना यावर्षी प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपयांच्या आर्डर होत्या. मात्र सामूहिक कार्यक्रमावर बंदी असल्याने आणि हा काळ लवकर संपणार नसल्याचे चिन्ह असल्याने शासनाने मंडप व्यापा यांचा विचार करावा आम्हालाही मानधन मिळावे.
0 टिप्पण्या