Trending

6/recent/ticker-posts

वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांच्या बेजबाबदारीचे कारनामे

मनपा एल विभाग सहाय्यक आयुक्त आणि वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांच्या बेजबाबदारीचे कारनामे

 


 

मुंबई 

 

रेड झोन मध्ये असलेला एल विभागातील कोरोना रुग्ण मृत्यूच्या छायेखाली वावरत आहे 1916 या हेल्पलाइन नंबर चा उपयोग तरी काय कृपया इकडे पुन्हा फोन करू नका असे सर्रासपणे म्हटले जाते( बोलणाऱ्याचे नाव डॉ.तेजस्विनी) प्रभागात एखादा रुग्ण आढळल्यास सहाय्यक आयुक्त यांना सूचना देऊनही त्यांच्याद्वारे कोणतीही सेवा पुरवली जात नाही वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना ऋग्ना बद्दल कळवले तर MOH साहेब डायरेक्ट नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकतात तब्बल दोन ते तीन दिवस पॉझिटिव्ह रुग्ण घरीच काढत आहे कारण या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही

1916 वर माहिती मिळत नसल्याचा आरोप मुंबई महानगर पालिका वार्ड क्र.१६२चे   नगरसेवक वाजीद कुरेशी  यांनी केला आहे

 

हॉस्पिटलमध्ये रुग्ण घेतली जात नाही, वॉर्ड ऑफिसरांकडे वेळ नाही, MOH साहेब नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकतात. अशा परिस्थितीत फोन करायचा कोणाला आणि उपचार घ्यायचे कुठे हे प्रश्न नगरसेवकाला प्रभागातील प्रत्येक रुग्णाचे नातेवाईक विचारतात मुंबई शहरातील एल विभाग मध्ये असे बेजबाबदार आधिकारी वावरत आहे याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना अजिबात नसेल नैतिक जबाबदारीची जाणीव असणाऱ्या अधिकाऱ्यांची एल विभागात खरच गरज आहे का

माझ्या प्रभागातील रुग्ण  साकीनाका च्या एक्झोन हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होता तीव्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये माहित पडताच हॉस्पिटल मधून बाहेर काढले रस्त्यावर बसून त्याने 1916 वर कॉल केला रिक्षा पकडून तो सेवेंहिल्स हॉस्पिटल ला गेला तिथे घेतले नसल्याने पुढे तो गोरेगाव येथील हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात गेला तिकडेही त्याला घेतले नाही तो पूना ऑटो पकडून घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात गेला तिकडेही त्याला कोणी घेतले नाही घाबरलेल्या परिस्थितीत सनीने मला कॉल केला व मी मरेल मला कृपया वाचवा असे भावूक होऊन सांगितली असल्याची माहीत कुरेशी यांनी दिली.

 

एका रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांसोबत किती भांडण करावे लागले ही माहिती

सनीच्या या प्रवासामध्ये त्याने तब्बल तीन रिक्षा बदलल्या अनेक लोकांशी संपर्क केला व जे जे लोक त्याच्या संपर्कात आले असतील व तो बसलेल्या रिक्षात बसले असतील त्यांना संसर्ग न झाल्याची गॅरंटी महानगरपालिका घेऊ शकते का वेळीस सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये रूग्णाला उपचार मिळाला असता तर प्रकरण एवढे पसरले नसते या प्रकरणाला सर्वस्वी जबाबदार एल विभाग सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर जाधव हेच आहे असा आरोप मुंबई महानगर पालिका वार्ड क्र.१६२चे   नगरसेवक वाजीद कुरेशी  यांनी केला आहे

 

Post a Comment

0 Comments