Trending

6/recent/ticker-posts

कोरोनावर मात करण्यासाठी  शिळ गावात  'अर्सेनिक  अल्बम - ३०'  गोळ्यांचे  वाटप  
कोरोनावर मात करण्यासाठी  शिळ गावात  'अर्सेनिक  अल्बम - ३०'  गोळ्यांचे  वाटप  

 

ठाणे

 

संपुर्ण देशात  सद्या कोरोनाने थैमान घातला असून आता शहरी भागासहित ग्रामीण  भागात  देखिल या विषाणुचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी शिफारस केल्याप्रमाणे होमिओपॅथिक ' अर्सेनिक  अल्बम - ३०' या गोळ्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असून कोरोनाशी लढण्यास साहाय्य करते.  म्हणून शहापूर तालुक्यातील  'स्वराज्य प्रतिष्ठान ,शिळ ' मंडळाच्या वतीने  शिळ गावात घरोघरी जाऊन ऐकून ४०० कुटुंबांना  अर्सेनिक अल्बम-30 होमीओपॅथी गोळ्या  वाटप   करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

 

यावेळी  बदलापूर येथील शिवसेना शहर प्रमुख नगराध्यक्ष वामन म्हात्रे,  यांचे विशेष सहकार्य लाभले असून,  प्रमोद बांगर, बाळू वेखंडे,गणेश म.बांगर चेतन बांगर, गणेश द. बांगर, ऋषिकेश किरपन, मनोज किरपन, संदेश बांगर, ऋतिक बांगर  यांनी गोळ्यांचे वाटप करुन त्याबाबत माहिती नागरिकांना दिली.  ज्या प्रकारे आपण परिवाराची  काळजी घेत असतो. त्याच प्रकारे आपण आपल्या गावातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हाच आपला गाव सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम राबविला आहे. असे  'स्वराज्य प्रतिष्ठान, शिळ'   या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.

  

  

Post a Comment

0 Comments