कोरोना विषाणूची स्वॅब व एक्स-रे चाचणी करणाऱ्या फिरत्या बसचे लोकार्पण
कोरोना विषाणूची स्वॅब व एक्स-रे चाचणी करणाऱ्या अत्याधुनिक व वातानुकूलित फिरत्या बसचे लोकार्पण आज वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे पार पडले. या लोकार्पण सोहळ्यात राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे व महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या संकल्पनेतून जी/ दक्षिण विभागामार्फत, क्रसना डायग्नोस्टिक्स प्रा. लि. पुणे व आय.आय.टी. एलुयुमनाय कौन्सिल इंडिया या संस्थांच्या वतीने सीएसआर फंडातून कोरोना चाचणीची अत्याधुनिक तांत्रिक बस तयार करून देण्यात आली आहे. या अत्याधुनिक बस मध्ये कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र रूमसह मोबाइल एक्सरेची सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ही चाचणी प्रशिक्षित तंत्रज्ञांकडून करण्यात येईल तसेच रेडिओलॉजी विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर विविध माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून कमी वेळेत व प्रभावीपणे रुग्ण शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासोबतच याप्रकारच्या बसेस तयार करून आरोग्य विभागाच्या संबंधित रूग्णालयांमध्ये कोरोना चाचण्यांसाठी यापुढे वापरण्यात येणार आहेत.
0 टिप्पण्या