Top Post Ad

इंटकच्या मागणीमुळे एस.टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला

महाराष्ट्र शासनाने एस.टी. महामंडळास २५० कोटी रुपये दिले,


एस.टी. कर्मचा-यांचे होणार वेतन, इंटकच्या मागणीला यश


ठाणे


महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एस.टी. कर्मचा-यांचे वेतन माहे एप्रिल २०२० देय मे २०२० संपूर्ण वेतन एकाच टप्प्यात देय असलेल्या तारखेस वेतन अदा करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. परंतू एस.टी. महामंडळाकडे वेतन अदा करण्याकरीता रक्कम उपलब्ध नसल्याने दि. १ मे २०२० रोजी व दि. ७ मे २०२० रोजी देय असलेल्या कर्मचारी व अधिका-यांना वेतन अदा करण्यात आलेले नव्हते. माहे एप्रिल २०२० देय मे २०२० या महिन्याचे वेतन प्रदान करण्यासाठी शासनाने सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी ३०० कोटी रूपये एस.टी. महामंडळास द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उध्दवजी ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केली होती  सदर मागणीची दखल घेऊन आज १४ मे रोजी शासनाने २५० कोटी रूपये मंजूर केले आहेत त्यामुळे कर्मचा-याच्या एप्रिल महिन्याचे वेतन सोमवार पर्यंत होणार असल्याचे महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने दि.२३ मार्च २०२० पासून एस.टी. सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाचे प्रती दिन २१ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडत आहे. सदर उत्पन्न बुडाल्यामुळे एस.टी. महामंडळाकडे कर्मचा-यांच्या वेतनाकरीता पुरेशी रक्कम उपलब्ध नव्हती. महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था मजबूत करण्याच्या हेतूने तसेच राज्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला किफायतशीर दरात दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एस.टी. महामंडळास १००० कोटी रुपयाच्या अनुदानासह विविध उपाय योजना करण्यासंदर्भात तसेच एस.टी. महामंडळास सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.



महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एस.टी. कर्मचा-यांचे वेतन माहे एप्रिल २०२० देय मे २०२० या महिन्याचे संपूर्ण वेतन एकाच टप्यात वेतन अदा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध प्रवास सवलत मुल्यांच्या पुर्तीप्रतिपोटी दयावयाच्या रकमेसह माहे एप्रिल २०२० देय मे २०२० या महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी ३०० कोटी रूपये एस.टी. महामंडळास द्यावेत जेणेकरुन एस.टी. कर्मचा-यांचे वेतन अदा होईल अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्री यांच्याकडे महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने करण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्र शासनाने विविध सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी थकबाकीतून २५० कोटी रूपये मंजूर केले आहेत त्यामुळे  एस.टी कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला असून १ लाख ५ हजार कर्मचा-यांना वेतन मिळणार  असल्याचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी माहिती दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com