Top Post Ad

ठामपाच्या पाणीपुरवठा विभागातील कामगार कोरोना सुरक्षा साधनांपासून वंचित

ठेकेदार  मे. विजया कंस्ट्रक्शन कंपनीचा अजब कारभार,  
पाणीपुरवठा विभागातील कामगार कोरोना सुरक्षा साधनांपासून वंचित


ठाणे 


ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कळवा प्रभागात कार्यरत सुमारे ६० वाल्वमैन / पंप ओपरेटर यांच्या प्रश्नांबाबत  ईमेल वर पत्रादवारे उप नगर अभियंता, विनोद पवार , उप अभियंता प्रशांत फिरके तसेच संबंधित ठेकेदार अतुल विखनकर (मे. विजया कंस्ट्रक्शन कंपनी) यांना कामगारानी व युनियन तर्फे वारंवार विनंती केली आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.  कामगारांना अद्यापही वेतन मिळाले नाही आणि सुरक्षिततेची साधनेही मिळाली नाहीत. पगार व सुविधा मागितले की, कामगारांना थातुरमातर उत्तर दिले जात आहे. तसेच कामावरून काढन टाकण्यात येईल अशी धमकी दिली जाते. याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी श्रमिक जनता संघाने पत्राद्वारे केली आहे. 


 मागील दोन वर्षात कामगारांना कधी गणवेश, बोनस, पीएफ, ईएसआयसी या कायदेशीर सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. आताच्या कोरोना लोक डाऊन सारख्या महामारीच्या काळात ही मास्क, हैंडग्लोव्ज, सेनिटायझर ई. सुरक्षेची साधने न पुरवून प्रशासन त्यांचेवर अन्याय करत आहे. सदरील कामगार हे वेगवेगळ्या ठिकाणी वस्त्यांमध्ये/ झोपडपट्टीत जाऊन पाणी पुरवठा साठी वाल्व ओपरेट करतात. अनेक ठिकाणी घनदाट वस्ती, छोट्या छोट्या गल्लीत जाऊन काम करावे लागते. या परिस्थितीत जर कोणत्याही कामगारांना कोरोना संसर्गाचा त्रास झाला तर संबंधित अधिकारी व ठेकेदाराला दोषी ठरविण्यात यावे, अशी मागणी याआधीही संघाने केली आहे.


मात्र या कामगारांना वेतन व अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देणे बाबतीत प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे.  महापालिका प्रशासनाचे हे कामगारद्रोही वर्तन अतिशय निषेधार्ह आणि कामगार कायद्यांचे अवमान करणारे आहे. जागतिक कामगार दिन तसेच पुरोगामी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस साजरी करत असताना ठाणे महापालिका प्रशासनाने याची तरी लाज बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 
सध्याच्या परिस्थितीत ठाण्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी व कोणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी शासन, महापालिका समाजसेवी संस्था शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.अश्या परिस्थितीत सेवा देणारे या कामगारांना त्यांचे हक्काचे वेतन अदा न करणारे ठेकेदाराला पाठीशी घालणारे अधिकारी देखील तितकेच दोषी आहेत जे अधिकारी जाणीव पूर्वक या कामगारांवर अन्याय करीत आहेत, त्यांना ती समज देवून तात्काळ उचित कार्यवाहीसाठी निर्देश द्यावे. सदर प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी यांचे विरोधात दफ्तर दिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई करावी. आर्थिक तंगीमुळे कामगार व त्यांचे कुटुंबीयांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. संबंधित कामगारांना तात्काळ न्याय मिळवून दयावे. अन्यथा नाईलाजाने कामगारांना काही अभिनव आंदोलनाचा मार्गाचा अवलंब करावा लागल्यास, त्यास ठामपा प्रशासन आणि संबंधीत ठेकेदार जबाबदार धरण्यात येईल. असे श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी पालिका प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com