संपूर्ण उरण तालुक्यात आर्सेनिक अल्बम 30 चे औषध गोळ्या वितरण करा- विठ्ठल ममताबादे

संपूर्ण उरण तालुक्यात आर्सेनिक अल्बम 30 चे औषध गोळ्या वितरण करा- विठ्ठल ममताबादेउरण


मुंबई मधील करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे त्या पार्श्वभूमीवर करोनाला रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांची रोगप्रतिकार शक्ति वाढवुन करोनावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचा डोस द्यायला सुरवात केली आहे. याचा लाभ सर्वसामान्य बरोबरच जेष्ठ नागरिक आणि कमी रोग प्रतिकार शक्ती असलेल्यांना अधिक होणार आहे. सध्या पालिकेच्या अनेक विभागात याची सुरवात झाली आहे. हळू हळू मुंबईतील सर्व विभागात याचे वितरण केले जाणार आहे. करोना रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरला असल्याने मुंबई महानगर पालिकेचा पॅटर्न संपूर्ण उरण तालुक्यात राबविन्यात यावा. मुंबई महानगर पालिकेच्या धर्तीवर संपूर्ण उरण तालुक्यात शहरात तसेच प्रत्येक गावागावात या औषधांचे फ्री मध्ये वितरण करण्यात यावे अशी मागणी उरणचे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी रायगड जिल्हाधिकारी, तहसीलदार उरण, पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे ईमेलद्वारे पत्रव्यवहार करून केली आहे.


आर्सेनिक अल्बम 30 हे होमिओ पॅथिक गोळी,औषध करोना पॉज़िटिव रुग्णांना घेता येणार नाही. करोना नसलेल्यांनाच ही गोळी घेता येणार आहे. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम(साईड इफेक्ट) नसल्याने या गोळ्या लहान मुला पासून ते वृद्ध, गरोदर महिला, मधुमेह,उच्च रक्तदाब आणि इतर आजार असलेले व्यक्तिही हे औषध घेवु शकतात. लहान मुले व जेष्ठ नागरिक यांनी मात्र वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांचा सल्ला घेवुनच हे औषध वापरावे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने याची सर्व राज्यांना शिफारस केली आहे.रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.सर्वसामान्यांसह आरोग्य सेविकांनाही या गोळ्या देण्यात येत आहेत.


उरण मधील करोना रुग्णची वाढती संख्या लक्षात घेता व उरण तालुका रेड झोन घोषित केल्याने उरण मधील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने व संपूर्ण उरण तालुका जलद गतीने करोना मुक्त करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रभावी व व्यापक उपाययोजना होणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने उरण तालुक्यात सर्वांना घरा घरात फ्री मध्ये आर्सेनिक अल्बम 30 च्या डोसचे,औषधांचे त्वरित वितरण करण्यात यावे जेणे करून करोना रोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल असे मत पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी रायगड जिल्हाधिकारी, तहसीलदार उरण, पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे केलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad