कवी मिलिंद जाधव यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून  बुद्ध जयंती

युवा कवी मिलिंद जाधव यांनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून  


कवितेतून सामाजिक संदेश देत  बुद्ध जयंती  केली घरीच  साजरी. 


भिवंडी


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पूर्ण  महाराष्ट्र लॉक डाऊन होत असताना सरकारी नियमाचे पालन करून भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहणारे युवा कवी मिलिंद जाधव यांनी  'युद्ध नको , बुद्ध हवा'  अशी कविता सोशल मीडियाच्या माध्यमातून  सादर करत प्रबोधन केले आहे. 


दरवर्षीप्रमाणे शहरा सोबतच ग्रामीण भागात देखील प्रत्येक गाव ,खेड्यापाड्यात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पडघा विभागात  साजरी करण्यात येते परंतु   कोरोना विषाणुचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आपल्या राज्यात संचारबंदी आणि  लॉक डाऊनच्या काळात  सरकारच्या आदेशाचे पालन करत  आपल्या परिवाराला  माहीत देत  बुद्ध जयंती  वैचारिक पध्दतीने घरीच  साजरी केली आहे. विश्वाला शांतीचा  संदेश तथागत भगवान गौतम बुध्दांनी  दिला आहे. म्हणून आपण माणसं  जोडण्याच काम करूया. समता निर्माण करण्याचं  काम करूया.  हेच खरे  बुद्धांना अभिवादन असेल असे युवा कवी मिलिंद जाधव यांनी बोलतांना सांगितले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad