Top Post Ad

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या रुग्णालयात

करोनाशी लढ्यासाठी ठाण्यात उभे राहाणार तात्पुरते १००० बेडचे रुग्णालय
 
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय;


ठाणे महापालिका आणि ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यातून उभे राहाणार रुग्णालय
 
ठाणे



करोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत १००० बेडचे रुग्णालय उभारण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला दिले. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ठाणे महापालिका हद्दीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेतील बैठकीत घेतला. यावेळी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. अंकित ठक्कर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, एमसीएचआयचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी उपस्थित होते.
केंद्राच्या पथकाने काही दिवसांपूर्वी ठाण्यात भेट देऊन करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली होती. या पथकाने रुग्णसंख्या वाढण्याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाची दखल घेऊन त्यानुसार उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश  शिंदे यांनी सोमवारच्या बैठकीत दिले. इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन, असिम्प्टोमॅटिक रुग्ण आणि क्रिटिकल रुग्ण यांची योग्य विभागणी करून आवश्यक उपचार केले जावेत. रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी कंटेनमेंट एरियामध्ये निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दक्षता बाळगून वेळीच उपाय करण्याची सूचनाही केली.
करोनावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता कमी पडू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या स्वरुपात १००० बेडच्या रुग्णालयात करण्याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तीन आठवड्यांच्या आत हे रुग्णालय उभारण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी बैठकीत दिले. या ठिकाणी ५०० बेड ऑक्सिजनच्या व्यवस्थेसह, ५०० बेड विना ऑक्सिजन, तसेच आयसीयू, पॅथॉलॉजिकल लॅब, एक्स रे, फीवर क्लिनिक आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य ज्युपिटर हॉस्पिटल करणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com