नवी मुंबईतील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये तात्पुरते कोव्हीड रुग्णालय
वाशीचे कामगार रुग्णालय विलगीकरण कशासाठी उपलब्ध करून द्यावे
नवी मुंबई
वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये करोना विरुद्धच्या लढ्यासाठी तात्पुरते काव्हिड रुग्णालय उभारण्यात येत आहे. नवी मुंबईत अशा प्रकारचे कोरोना रुग्णालय उभारण्याची पहिली मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली होती.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या रुग्णालयाची उभारणी होणार असून तब्बल ११०० बेड्सच्या या रुग्णालयात डायलिसिस सेंटर, लॅब, ऑक्सिजन, एक्स रे अशा सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत.
मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात १००० बेड्सचे रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून ठाण्यातही १००० बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येत आहे.
नवी मुंबईतील कोरोना कोव्हिड सेंटरच्या, सिडको एक्झिबेशन सेंटर, वाशी मनपा कोव्हिड सेंटर, स्वामी विवेकानंद कोव्हिड सेंटर व इंडिया बुल्स कोव्हिड सेंटर या ठिकाणी महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते रविंद्र इथापे, क्रिडा सभापती डाॅ जयाजी नाथ, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ बाळासाहेब सोनवणे यांनी भेट दिली. मनपाच्या वतीने सिडको एक्झिबेशन सेंटर येथे १२०० खाटांचे रूग्णालय उभारले जात असुन, वाशी येथील मनपाच्या सर्वसाधारण हाॅस्पिटल व इतर ठिकाणी कोरोनाग्रस्थ रूग्णाची व्यवस्था कशी केली जाते याची पाहणी करून योग्य त्या सुचना महापौर,सभागृह नेते व सदस्यांनी केल्या.
वाशीचे कामगार रुग्णालय विलगीकरण कशासाठी उपलब्ध करून द्यावे...
नवी मुंबईत कोरोना बाधीतांचा आकडा वाढतो आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रुग्णवाढीचा वेग जास्त असेल असा अंदाज केंद्रीय पथकाने याअगोदरच महाराष्ट्राचा पाहणी दौरा करताना वर्तविला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता नवी मुंबई महापालिकेला देखील विलगीकरण कक्ष आणि वैद्यकीय उपचारासाठी जास्तीत जास्त जागांची आवश्यकता भासणार आहे. सध्या नवी मुंबई महापालिकेने काही इमारती ताब्यात घेऊन त्याठिकाणी अलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. पालिका रुग्णालयांमधून आणि काही खाजगी रुग्णालयांमधून कोरोना वर उपचार सुरू आहेत. यापुढील काळात वाढत्या रुग्णसंख्येचा धोका ओळखून अधिकाधिक इमारती पालिकेला उपलब्ध करून घ्याव्या लागतील. कोरोना विरोधातील या लढाईमध्ये पालिकेला सक्षम करण्याची गरज आहे. राज्य कामगार विमा कर्मचारी मंडळाच्यावतीने वाशी येथील कामगार रुग्णालय इमारतीचा अलीकडेच पुनर्विकास करण्यात आलेला आहे. रुग्णालयाची प्रशस्त इमारत बांधून पूर्ण झाली असून वापराविना पडून आहे. ही इमारत नवी मुंबई महापालिकेकडे काही काळ कोरोना वरील वैद्यकीय उपचारासाठी आणि विलगीकरण कक्षासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी महत्त्वाची मागणीदेखील आमदार गणेश नाईक यांनी 7 मे रोजी पत्र पाठवून केंद्रीय आरोग्यमंत्री ,राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, आरोग्यमंत्री कामगार मंत्री , विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
0 टिप्पण्या