भाजप युवा मोर्चातर्फे ठाणे नगर पोलिसांना सॅनिटायझर आणि फेसशील्डचे वाटप

 भाजप युवा मोर्चातर्फे ठाणे नगर पोलिसांना सॅनिटायझर आणि फेसशील्डचे वाटप


भारतीय जनता पार्टीच्यावतीने ठाणे शहरात `फिव्हर क्लिनिक'


ठाणे


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्व न करता पोलिस यंत्रणा आहोरात्र रस्त्यावर लढत आहे.  राज्यात कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा, पोलीस, अत्यवश्यक सेवा सज्ज आहेत. लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढल्यामूळे पोलिसांवरील ताण अधिक वाढला आहे. लॉकडाऊनच्या या काळात पोलिसांच्या जीवाला कोरोनामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामूळे त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याकरिता ठाण्यातील भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश मधुकर कोळी आणि भाजपा कार्यकर्ते बाळाराम खोपकर यांच्या वतीने ठाणे नगर पोलिस स्थानकच्या पोलिसांना सॅनिटायझर आणि फेसशिल्ड देण्यात आल्या आहे.ठाणे नगर पोलीस स्थानकातील पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे स्थानकात खूप चिंतेचे वातावरण होते.बहुतेक पोलीस कर्मचारी क्वारंटाईन झाले होते .हि बाब लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी ह्यांचा ताब्यात सॅनिटायझर आणि फेसशिल्ड देण्यात आल्याचे निलेश कोळी यांनी सांगितले. त्यावेळी निलेश डोके, संतोष साळुंखे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.`कोविड 19' विरोधात लढाईत आपल्याला घरातच राहून बाहेरच्या जगापासून होणारा संसर्ग टाळायचा आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे आबाल-वृद्धांना अनेक वेळा ताप, सर्दी आणि खोकल्याला सामोरे जावे लागते. मात्र, सद्यस्थितीत अशी लक्षणे झाल्यास `कोरोना'च्या भीतीने नागरिक हवालदिल होतात. अशा नागरिकांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने ठाणे शहरात `फिव्हर क्लिनिक' सुरू आहेत. या क्लिनिकमध्ये डॉक्टर, नर्स असतील. त्यांच्याकडून आपली प्राथमिक तपासणी करुन, आवश्यक औषधेही दिली जातील. दुर्दैवाने एखाद्या रुग्णाला `कोविड -19' सदृश लक्षणे दिसल्यास त्याला तत्काळ कोरोनासाठी राखीव रुग्णालयात दाखल केले जाईल. आपल्या आजारावर उपचार करण्याबरोबर `कोविड-19'चा प्रसार टाळण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी भाजपाचे स्थानिक नगरसेवक कार्यरत आहेत. आपल्या घराजवळ असलेल्या डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करुन घ्यावी असे आवाहन आमदार  निरंजन वसंत डावखरे यांनी केले आहे.
ठाणे शहरातील फिव्हर क्लिनिकची यादी खालीलप्रमाणे आहे.


वृंदावन सोसायटी 
* डॉ. प्रेमचंद्रन - 9969358792
* डॉ. शुभांगी चव्हाण - 9833791689


नौपाडा 
* डॉ. निर्मला शहा, विष्णू नगर - 9819811373


घोडबंदर रोड 
* डॉ. कोलगे - 9224288962
* डॉ. शिंदे - 9224016364
* डॉ. चव्हाण - 9702486819
* डॉ. अजय सिंह - 9820427728


खारकर आळी 
* डॉ. पारस जैन - 9821776563


गोकूळनगर 
* डॉ. ए. बी. पाटील - 9987900097


कळवा
* डॉ. राणा पी. हिरा - 9004646719


कळवा, भास्करनगर
* डॉ. योगेश यादव - 9167336586


विटावा
* डॉ. भोंडवे क्लिनिक, भवानी चौक - 9819061878
* डॉ. दिनेश पडवळ - 9892266342


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA