Trending

6/recent/ticker-posts

गावाकडे निघालेल्या मजुरांना वनविभागाकडून एक घास प्रेमाचा ;

गावाकडे निघालेल्या मजुरांना वनविभागाकडून एक घास प्रेमाचा ;

हा उवक्रम आठ दिवस सुरू राहणार 

 

शहापूर

 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र सरकारने टाळेबंदी ३ मे पर्यंत वाढवली. टाळेबंदी वाढविल्याने परप्रांतीय मजुरांना आर्थिक चणचण भासू लागली असून सर्व उद्योगधंदे बंद असल्याने हाताला काम नाही. त्यामुळे बहुसंख्य उत्तर भारतीय मजूर चालत आपल्या गावाकडे निघाले आहेत. त्यांना दुपारचे रस्त्यात एक वेळचे जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून "एक घास प्रेमाचा" ही संकल्पना शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी राबवत आहेत. शहापूर वनपरिक्षेत्र हद्दीतील  खातिवली  तपासणी नाका येथे येणाऱ्या प्रत्येक मजुराला जेवण व पाणी दिले जात आहे. हा उपक्रम पुढील आठ दिवस सुरू राहणार असल्याची माहिती शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांनी दिली आहे. 

 

शहापूर वनविभागाच्या वनपरिक्षेत्र शहापूर हद्दीतुन उत्तर प्रदेशातील बहुसंख्य मजूर पायी चालत आपल्या गावाकडे जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना एकवेळचे भोजन व पाणी देऊन "एक घास प्रेमाचा" हा उपक्रम राबविला. यासाठी शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, वनपाल दगडू घुगे, दत्तात्रय शिंदे, कमलाकर मोरघे, सुनिल गोंडवले, भांगरे, कदम, बोरसे तसेच त्यांचे सहकारी सर्व वनरक्षक आदींनी शहापूर वनपरिक्षेत्रातील खातिवली तपासणी नाका येथे खिचडी तयार करून महामार्गावरून जाणाऱ्या मजुरांना एक वेळच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था करून दिली. जेवणाच्या कालावधीत शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले सामाजिक अंतर ठेवून खिचडी वाटप करण्यात आले. जेवणाच्या दरम्यान सदर मजुरांमध्ये प्रबोधन करून चालत जात असताना रस्त्याच्या बाजूला वनवा लावू नका किंवा जर कुठे वनवा लागलेला दिसला तर त्वरित विझविण्यासाठी सहकार्य करा असे देखील सांगण्यात आले. हा उपक्रम पुढील आठ दिवस रोज चालू राहणार आहे.  शुक्रवारी १५० लोकांना जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. असेही प्रकाश चौधरी यांनी सांगितले. 

 


 

 

Post a Comment

0 Comments