वाढलेल्या लॉकडाऊनचे नियम पहिल्यापेक्षा अधिक कठोर - पंतप्रधान
नवी दिल्ली
देशातली लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन 14 एप्रिल रोजी संपुष्टात आला. त्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजता पंतप्रधानांनी देशवासियांशी संवाद साधला. यामध्येच त्यांनी ही सर्वात मोठी घोषणा केली. त्याच वेळी या वाढलेल्या लॉकडाऊनचे नियम पहिल्यापेक्षा अधिक कठोर असतील असं मोदींनी स्पष्ट केलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वीच महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाउन जारी राहणार असल्याचे घोषित केले आहे.
आपण सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचा जो निर्णय घेतला त्याचा फायदा आपल्याला मिळाला आहे. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्हा, तालुक्याचं परीक्षण केलं जाईल. जिथे कोरोनाचे रुग्ण कमी असतील, ज्यांनी संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये हॉटस्पॉट होण्याची क्षमता कमी असले, तिथेच थोड्याफार सवलती दिल्या जातील, "बुधवारी यासंदर्भात सरकारी गाइडलाईन जाहीर केल्या जातील. नवीन गाइडलाइन बनवताना रोजंदारीवर काम करणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. तसेच देशात अनेक ठिकाणी रबी पिकांची कापणी सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारशी चर्चा करून शेतकऱ्यांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी काळजी घेतली जाईल," असं मोदी म्हणाले.
कोरोनाचे १० हजार हून अधिक रुग्ण आढळले की पंधराशे ते सोळाशे बेडची गरज भासते. आपण एक लाख बेडची व्यवस्था केलीये. देशात ६०० कोविड सेंटर आहेत, जिथे केवळ याच रुग्णांवर उपचार होतील. अशी माहिती त्यांनी दिली. पीएम मोदींनी 24 मार्च रोजी संबोधित करताना कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी 25 मार्च पासून 14 एप्रिल पर्यंत देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते, की कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी लक्ष्मण रेषेचे पालन करावे.
0 टिप्पण्या