नागरिकांना रेशनिंग नाकारणाऱ्या शिधावाटप दुकानदाराला मनसेचा दणका

नागरिकांना रेशनिंग नाकारणाऱ्या शिधावाटप दुकानदाराला मनसेचा दणका

  

ठाणे

 

कोरोनाची लागण रोकण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरु आहे. तसेच संचारबंदी करण्यात आली आहे.या काळात समान्यांना रेशनिंग शिधावाटप दुकानातून देण्यास सुरुवात झाली असली तरी काही शिधावाटप दुकानदार नागरिकांना धान्य देण्यास नकार देत असल्याने अशा ठाण्यातील पाचपाखडी येथील दुकानावर मनसेने धडक देऊन दुकानदाराला चांगलेच धारेवर धरले.

सध्या कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉक डाऊन आल्याने नागरिकांची मिळकत बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.त्यामुळे नागरिकांना त्रास देऊ नका असा इशारा मनसेने कालच सर्व शिधावाटप दुकानदाराना दिला होता असे असताना देखील पाचपखाडी येथील शिधावाटप दुकानावर मिळणारे धान्य देण्यास दुकानदार टाळाटाळ करत असल्याची तक्रार नागरिकांनी मनसेकडे केल्यावर मनविसेचे ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष दिनेश मांडवकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पाचपखाडी येथील या शिधावाटप कार्यलयावर धडक देऊन नागरिकांना धान्य नाकारणाऱ्या  दुकानदाराला चांगलेच धारेवर धरले.दुकानात धान्य असताना देखील नागरिकांना धान्य देण्यास नकार देणाऱ्या या दुकानदाराला मनसेने दणका दिल्यावर दुकानदाराने माफी मागत यापुढे असे कृत्य होणार नाही असे आश्वासन दिले.परंतु परत जर असा प्रकार घडला तर मनसे स्टाईल आंदोलन करो असा इशारा दिनेश मांडवकर यांनी दिला यावेळी सुनिल तुपे,राहुल दोडके,समीर सातमकर,लौकिक धोंडे,निखिल पवार,अमोल जुवळे,वैभव धारवे,बाबू भोईर अशी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA