पालिकेच्या शिक्षक, पाणी खात्यातील कर्मचारी व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी करताहेत सर्व्हेक्षण

सर्व्हेक्षणामुळे नागरिकांत गोंधळाचे वातावरणपालिकेच्या शिक्षक, पाणी खात्यातील कर्मचारी व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी करताहेत सर्व्हेक्षण


ठाणे


ठाणे महानगरपालिकेच्या निर्मला देवी दिघे रुग्णालयाच्या परिचारिका, प्रसाविका,आशा वर्कर, ठामपा चे शिक्षक,पाणी खात्यातील कर्मचारी व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी मिळून ४८ जणांच्या ग्रुप तर्फे  प्रत्येक दोन जणांच्या टीम रोज १०० घराघरात जाऊन सर्दी ताप,खोकला सदृश्य  आजार व संशयीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी करत आहेत. यात कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील म्हणजे अतिजोखमीच्या व्यक्तींना घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा  येथे ठेवण्यात येते तर कमी जोखमीच्या व्यक्तींची आवश्यक तपासणी करून त्यांना घरातच इलाज करून विलगीकरण करण्यात येत आहे.


कल्याण-डोंबिवलीतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 73 वर गेला असून डोंबिवलीतील रुग्णांचा त्यात समावेश जास्त असल्याने भितीपायी नागरिकांच्या मनाचा नुसता गोंधळ उडाला असल्याचे चित्र दिसत आहे. एखाद्या विभागात कोरोना बाधित रुग्ण सापडताच आजूबाजूच्या सोसायट्या, घरांचा सर्वे कधी करणार, हा कोणता सर्वे होता, आमच्याकडे तर अद्याप सर्वे झालेला नाही, कधी येणार पालिकेचे कर्मचारी सर्वेला असे अनेक प्रश्न येथील नागरिक विचारत असून या सर्व्हेमुळे नागरिकांच्या गोंधळात भर पडत आहे. विभागात सर्वे होताच काही घरांतील नागरिकांनी तर भितीपायी आजूबाजूचा संपर्कच तोडल्यासारखे वागत आहेत. यामुळे शेजारधर्मातही वितुष्ट निर्माण होत असल्याचे पहायला मिळत आहे.


कल्याण डोंबिवली क्षेत्रात शनिवारी 13 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले यातील 12 रुग्ण हे डोंबिवलीतील आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मानपाडा रोडवरील आयकॉन रुग्णालयात कोरोनाबाधित चार रुग्ण सापडल्याने तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. डोंबिवलीतील मानपाडा रोड, नांदिवली रोड परिसरातील नागरिकांच्या मनात देखील भीतीचे वातावरण आहे. आयकॉन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या तक्रारी विभागात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास त्या विभागाचा पालिका आरोग्य विभागाकडून सर्वे केला जात आहे. परंतू हे सर्वे करणारे कर्मचारी सर्वच घरांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी आयरे गाव, म्हात्रे नगर परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. या भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असून 40 ते 50 नागरिक क्वारंटाईन असल्याचे समजताच काही नागरिकांनी धसकाच घेतला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad