पर्यटनाशी निगडित व्यावसायिकांकरिता झोस्टलचा पुढाकार
मुंबई
जगभरातील पर्यटन व्यवसायावर कोरोना व्हायरसचा विपरीत परिणाम झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर समूह आधारीत तसेच अनुभवातून उभारलेल्या इकोसिस्टिम झोस्टलने संबंधित उद्योग भागीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात कॅफे मालक, कॅफे मालक, एडव्हेंचर कंपन्या, पर्यायी निवास प्रदाते, मालमत्ता व्यवस्थापक आणि फ्रँचाइजी मालक यांचा समावेश असेल. त्यांना आपल्या इकोसिस्टममध्ये समाविष्ट करण्याचे आमंत्रण देत झोस्टलचा उद्देश्य पर्यटनावर पूर्णतः अवलंबून असणा-या जमिनी स्तरावरील कर्मचा-यांसोबतच व्यावसायिक भागीदारांना या संकटातून बाहेर पाडण्यासाठी मदत करण्याचा आहे. या पुढाकाराद्वारे ब्रँड नव्या युगातील प्रवास करण्यासाठी इच्छुकांकरिता सवलतीच्या दरात रिडीमेबल, क्रेडिट आधारित ट्रॅव्हल पॅकेजची सुविधादेखील प्रदान करत आहे. झोस्टलचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मवीर सिंह चौहान यांनी प्रवासी समुदायाला लिहिलेल्या ओपन लेटरद्वारे या व्यवसायाशी निगडित कंपन्यांना महामारी विरोधात एकत्रित येण्यासाठी प्रेरित तर केले आहे.
0 टिप्पण्या