ठाणे महानगर पालिकेचे सोसायट्यांना निर्बंध


ठाणे महानगर पालिकेचे सोसायट्यांना निर्बंधठाणे


 ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. ठाणे महापालिका प्रशासनाकडून या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचा पुढील टप्पा म्हणून शहरातील सर्व सोसायटींसाठी ठामपाने नियमावली तयार करण्यात आली आहे. सदर नियमावली शहरातील प्रत्येक सोसायटींना देण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये प्रत्येक सोसायटीने काय करावे काय करु नये याची नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये सोसायटीच्या कॉमन एरीया, पार्कीग व अन्य पेसेजमध्ये मॉर्निंग वॉक, इव्हनींग वॉकसाठी या भागांमध्ये जाऊ नये तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू याची काळजी घ्यावी असेही नमुद करण्यात आले आहे.


सोसायटीच्या एखाद्या सदस्याने देखील या निमयावलीकडे दुर्लक्ष केले तर त्याला सुरवातीला दंडात्मक कारवाई करावी, त्यानंतरही सभासद ऐकत नसले तर त्याच्या विरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, सोसायटीमध्ये असलेल्या नर्संग होम, दवाखाने, औषध दुकाने या ठिकाणी सोशल डिस्टेसींगचे पालन करण्यात यावे, त्यातही सोसायटीमधील एखादा नागरीक कोरोना बाधीत आढळला तर त्याच्या घरच्यांना अपमानास्पद वागणुक देऊ नये असेही या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमावलींचे पालन न झाल्यास संबधीत सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. प्रत्येक सोसायटीचा अध्यक्ष आणि सचिव याने कोरोनाच्या दृष्टीने नियमावली तयार करावी ती सोसायटीच्या सुचना फलकावर प्रसिध्द करावी. असे सांगण्यात आले आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad