Top Post Ad

ऑनलाईन देणग्यांमध्ये १८० टक्क्यांची वाढ - रेझरपेचा अहवाल


  • लॉकडाऊनच्या ३० दिवसांत रेझरपेच्या अहवालानुसार ऑनलाईन देणग्यांमध्ये १८० टक्क्यांची वाढ,

  • सोशल डिस्टन्सिंगमुळे बील भरणे सारख्या उपयुक्त सुविधा क्षेत्रात ७३ टक्के, माहिती व तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात ३२ टक्के, आणि प्रसारमाध्यमे व मनोरंजन क्षेत्रात २५ टक्के वाढ

  •  ब आणि क दर्जाच्या शहरांनी केले डिजीटल पेमेंट आत्मसात. जिओ मनी आणि पेटीएम सारख्या सुविधांमध्ये वाढ



 


बंगळुरु, :
 रेझरपे या आर्थिक सुविधा पुरविणाऱ्या संस्थेने आज ‘दी एरा ऑफ रायझिंग फिनटेक’ या अहवालाची पाचवी आवृत्ती प्रकाशित केली. त्रैमासिक तत्वावर डिजीटल व्यवहाराचा आणि विशिष्ट उद्योजकीय शोधांमुळे होणारे परिणाम यांच्या नमुन्याचे विश्लेषण करुन त्याच्या अनुषंगाने फिनटेक इकोसिस्टमचा सखोल अभ्यास करुन हा ऐतिहासिक अहवाल तयार करण्यात आला आहे. जगभर कोविड-१९ चा हैदोस असताना तीस दिवस झालेल्या राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान डिजीटल पेमेंट वर काय परिणाम झाला याविषयी हा अहवाल माहिती देतो.
या अहवालातील तथ्य रेझरपेच्या माध्यमातून २४ फेब्रुवारी ते २३ मार्च (लॉकडाऊन पूर्व) आणि २४ मार्च ते २३ एप्रिल (लॉकडाऊन दरम्यान) झालेल्या व्यवहारांवर आधारीत आहे.
-          सर्वसामान्य लोक घरातच राहिल्याने बील भरणे सारख्या उपयुक्त सुविधा क्षेत्रात ७३ टक्के, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात ३२ टक्के, आणि प्रसारमाध्यमे व मनोरंजन क्षेत्रात २५ टक्के वाढ पाहिली गेली.
-          काही क्षेत्रात लॉकडाऊनमुळे घसरण देखील झाली- वितरण साखळीतील कमतरतेमुळे लॉजिस्टीक क्षेत्रात तब्बल ९६ टक्के घसरण झाली. पर्यटन क्षेत्रात ८७ टक्के, रिअल इस्टेट मध्ये ८३ टक्के, अन्न आणि पेय क्षेत्रात ६८ टक्के आणि किराणा क्षेत्रात ५४ टक्के घट झाली.  
-          स्वयंसेवी संस्थांना लॉकडाऊन दरम्यान मदत करण्याचा ओघ दिसून आला. तब्बल सामाजिक संस्थांना ऑनलाईन देणगी देण्याच्या व्यवहारात १८० टक्के वाढ झाली. बाधित व्यक्तींना मदत करण्यास सर्वसामान्य नागरिकांचा भरभरुन पाठिंबा मिळत आहे हेच यातून प्रतित होत आहे.
-          या ३० दिवसांत अहमदाबादमध्ये ४३ टक्के, मुंबईमध्ये ३२ टक्के तर चेन्नईमध्ये २५ टक्के अशी अनुक्रमे व्यवहारांत वाढ झालेली आहे.
-          लॉकडाऊन दरम्यान कर्नाटक (२१ टक्के), महाराष्ट्र (१६ टक्के) आणि तेलंगाना (११ टक्के) या राज्यांचे सर्वाधिक योगदान दिसून आले. तर गुजरात (४१ टक्के), मध्य प्रदेश (३९ टक्के) आणि तामिळनाडू (२६ टक्के) अशी घसरण झालेली पाहण्यात आले. 
-          लॉकडाऊन दरम्यान देय पद्धतीं मध्ये युपीआय या देय पद्धतीचा सगळ्यात जास्त म्हणजे ४३ टक्के वापर झाला. यानंतर डेबिट आणि क्रेडिट कार्डस देय पद्धतींचा ३९ टक्के तर नेटबॅंकिगचा १० टक्के वापर झाला. तथापि लॉकडाऊनफुर्व ३० दिवसांची तुलना केली असता झालेल्या व्यवहारांत युपीआय, कार्ड्स आणि नेटबॅंकिंग मध्ये अनुक्रमे ३७%, ३०% व २८% घट दिसून आली.
-          युपीआय ऍप मध्ये गुगल पेच्या माध्यमातून सर्वांत जास्त ४६ टक्के, फोन पे २९ टक्के तर पेटीएमचा वापर १० टक्के झाला. लॉकडाऊन दरम्यान पेटीएमने ४७ टक्के, गुगल पे ने ४३ टक्के आणि फोन पे ने ३२ टक्क्य़ांची घसरण अनुभवली.  
-          विशेषत: ब दर्जाच्या शहरांमध्ये मोबाईल वॉलेट प्रकारच्या व्यवहारात वाढ दिसली. पीएम केअर्स फंड आणि कॅशबॅक ऑफर्स व्यवहारामध्ये जिओ मनी ६६ टक्के, ऍमॅझॉन पे ६३ टक्के आणि पेटीएम ४३ टक्के याचा जास्त वापर झाला.
-          देशातील एकूणच डिजीटल देय व्यवहारात ३० दिवसांत ३० टक्क्यांची घसरण झाली.


रेझरपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक हर्षिल माथूर म्हणाले कि, गेल्या ३० दिवसांत ऑनलाईन पेमेंट मध्ये ३० टक्क्यांची लक्षणीय झालेली घसरण नोटाबंदी नंतर आम्ही पहिल्यांदा पाहत आहोत. मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यात ऑनलाईन खर्च करण्याच्या प्रक्रियेत १० टक्के वाढ झाली होती. परंतु नंतर घरात राहण्याच्या सावधगिरीमुळे यात घट झाली. विविध आघाड्यांवर कोविड-१९ मुळे जेव्हा अनिश्चितता सुरु झाली तेव्हा ही संसर्गाची साथ फिनटेक उद्योगासाठी विविध कारणांनी कलाटणी देणारी ठरली. लॉकडाऊनच्या गेल्या ३० दिवसांत ‘अ’ आणि ‘ब’ दर्जाच्या शहरांनी प्रचंड प्रमाणावर डिजीटल पेमेंटच्या वापरास अंगिकारलेले आहे हे त्याचंच द्योतक आहे.   
ते म्हणाले, फिनटेक कंपन्यांसाठी ही मोठी संधी आहे असे मला वाटते. नफ्यापेक्षा ग्राहक मिळवणे आणि वृद्धीस प्राधान्य देणे याकरिता यातील” ग्राहकांची मागणी आणि वर्तणूक यांच्याशी जुळवून घ्यायचं असेल तर फिनटेक उद्योगास बदलावं लागेल, मोठा विचार करावा लागेल आणि धाडसी पाऊले उचलावी लागतील. त्याकरिता पेमेंट आणि बॅंकिंग सुविधांमध्ये नवीन गोष्टी आणाव्या लागतील. कोविड-१९ उत्तरार्ध जगात बॅंका आणि फिनटेक कंपन्यांचे एकमेकांशी विश्वासात्मक असे दृढ बंध तयार होतील. हे एकप्रकारे डिजीटल आयुध असेल जे कोणत्याही बॅंकेचे पूर्ण व्यावहारिक डावपेच असतील हे मला आताच स्पष्ट दिसतंय. काही विलीनीकरण आणि संपादनांची शक्यता सुद्धा लॉकडाऊन उत्तरार्धात होण्याची शक्यत मला अपेक्षित आहे. नक्कीच खूप साऱ्या बाबींविषयी आताच .सांगू शकत नही. पण लवकरच व्यापक अर्थकारण लवकरच सामान्य होईल.   
गेल्या दोन वर्षांत रेझरपेच्या वृद्धीचा आलेख चढताच राहिलेला आहे.२०१९ मध्ये ५०० टक्क्यांनी कंपनी वाढली असून प्रत्येक महिन्याला ३५ टक्क्याने वाढ होतच आहे. १० लाखाहून अधिक कंपन्यांचे पेमेंट्स रेझरपेच्या माध्यमातून होते. इंडिगो, बीएसई, थॉमस कूक, रिलायन्स, स्पाईस जेट, आदित्य बिर्ला, सोनी आणि ओयो सारख्या कंपन्यांचा यात समावेश आहे. यावर्षी हा आकडा १ लाख ४० हजार पर्यंत नेण्याचे टीमची योजना आहे.
एकीकडे सध्याची परिस्थिती निवळण्याची जग आशा करत आहे. रेझरपे सुद्धा प्रत्येक कंपनी आणि व्यक्तींना विनंती करते की शक्य त्या सर्व सावधगिरी बाळगा आणि उपाययोजनांचे पालन करा. यातच आपल्या सर्वांचे हित सामावलेले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com