हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसाठी मुंबई महानगरपालिकेची नवी योजना

हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसाठी मुंबई महानगरपालिकेची नवी योजनामुंबई


मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी योजना तयार करण्यात आली आहे.  खासगी डॉक्टरांच्या साहाय्याने, धारावीतील ३५० खासगी दवाखाने सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या दवाखान्यांमध्ये नॉन कोविड उपचारांसोबतच, कोरोना संशयितांचीही प्राथमिक चाचणी करण्यात येणार आहे. धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत, धारावीतील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला इंडियन मेडिकल कौन्सिल आणि माहीम-धारावी मेडिकल प्रॅक्टिश्नर असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


खासगी दवाखान्यात आलेल्या नॉन-कोविड नागरिकांवर उपचार केले जातील. तसेच, संशयित रुग्णांना कोरोनाची लक्षणे, कोरोनाची विनामूल्य चाचणी, त्यावरील विनामूल्य उपचार, कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांना पालिकेकडून देण्यात येणाºया मोफत सुविधा यांबाबतची माहितीही खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांना दिली जाणार आहे.  संशयित रुग्णांचा तपशील पालिका प्रशासनाला कळवून पुढील कारवाई केली जाणार आहे. या खासगी डॉक्टरांना पीपीई किट, सॅनिटायझर आणि दवाखान्याचे सॅनिटायझेशन या सुविधा महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणार आहेत. याआधीच धारावीतील सुमारे ५० हजार नागरिकांची घरोघरी जाऊन स्क्रिनिंग केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या हस्ते या डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA