Top Post Ad

कोरोना संकटात वंचित बहुजन आघाडीचाही मदतीकरिता पुढाकार

कोरोना संकटात वंचित बहुजन आघाडीचा खारीचा वाटा ;

७५० गरीब गरजू कुटुंबाना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

  

शहापूर

कोरोनाच्या महामारीने देश लॉकडाऊन झाला परिणामी लाखो हातावर पोट असणारे मजूर, कंत्राटी कामगार यांची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. जिवनावश्यक वस्तू देखील मिळेनाश्या झाल्या आहेत. टाळेबंदी काळात गरीबाच्या घरातील चूल पेटली पाहिजे त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत  टाळेबंदी काळात अडकलेल्या गरिबांना मदती अभावी केवळ उपाशी मरायला सरकार सोडून देते. एड.बाळासाहेब आंबेडकर यांनी टाळेबंदीच्या काळात गरीबाच्या घरातील चूल कशी पेटेल, त्यांना वेळेवर जीवनावश्यक वस्तू कश्या मिळतील यासाठी काम करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना  केले होते. त्याच आवाहनाला अनुसरून वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्रभर गरजूंना मदत पोहचविण्याचे काम करत आहेत. अशीच मदत आपल्या निवडक कार्यकर्त्यांना घेऊन   वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा युवक अध्यक्ष अमर भरीत हे शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात करत आहेत. 

 

या संकट काळात भरीत व त्यांचे कार्यकर्ते हे कसारा व परिसरातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरून पायी प्रवास करणाऱ्या मजुरांना मदत पोहचविण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.  त्यांनी व सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत कसऱ्या मधील मिलिंद नगर, पंचशील नगर, आनंद नगर, देऊळ वाडी, निंगळ वाडी, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, राहुल नगर, सिद्धार्थ नगर, समता नगर शिवशक्ती नगर, शिवाजी नगर, महात्मा फुले नगर, व तानाजी नगर तसेच डोल्हारा गावात १२६ कातकरी कुटुंबाना, भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांचे दत्तक गाव विहिगाव येथे ४० कुटुंबाना, राड्याचा पाडा, आंब्याचा पाडा, मोखावणे कातकरी वाडी, लतीफ वाडी आदी भागात आतापर्यंत ७५० गरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.  

 

याप्रसंगी अमर भरीत, बाळासाहेब हिवरे, वसंत उबाळे, दिपाताई हिवरे, नंदिनी भरीत, शांता पंडित, जयश्री पंडित, रोहिणी गांगुर्डे, मनीषा पंडित, शरीफखान पठाण,  बाबुराव शेजवळ, मिलिंद पंडित , मगन गवळे, चिंतामण भालेराव, गौतम पगारे, राजू गांगुर्डे, कैलास शिंदे, सचिन निकाळे, चंद्रकांत पंडित, सत्यवान गांगुर्डे,महेंद्र लोखंडे, चेतन पगारे, संदीप सोनवणे ,नारायण पेढेकर ,नवनीत पंडित,मुकेश कुशवाह, सुमित भोळे, बाळा पराड, राजू फसाळे,  सागर सोनवणे,किरण बेंडकुळे,रोशन उबाळे, राजू लोणे, सुनील पवार, राज साबळे, सचिन बागुल, जीवितेश शिंदे, उल्हास पंडित, संतोष गवळे, सागर रोकडे, पंकज कर्डक, आकाश गांगुर्डे आदींनी मेहनत घेतली. 

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com