रिपाई पदवीधर विभागाच्या वतीने स्थलांतरित नागरिकांना अन्नदान रिपाई पदवीधर विभागाच्या वतीने स्थलांतरित नागरिकांना अन्नदान 

 

शहापूर 

 

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या कोकण पदवीधर मतदार संघ अध्यक्ष ज्ञानमित्र चिरनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी   कोकण पदवीधर मतदार संघाचे अध्यक्ष  अमोल गायकवाड व ठाणे जिल्हा संघटक सचिव जोसेफ डिसोझा यांनी पिडीत युपी बिहारचे नागरिक जे लहान मुलांबाळासहीत पायी चालत जात होते व प्रशासनाने त्यांना आडवल्याने धड पुढे जाता येईना व मागे फिरता येईना. त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शनिवारी  त्यांना अन्न दान तसेच बिसलरी पाणी, मास्क देण्यात आले व शहापूर तहसीदार यांच्याशी संपर्क साधून पिडीतांना प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याची तजवीज केली.

यावेळी रिपाई  ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद थोरात, महिला आघाडी शहापूर तालुका उपाध्यक्षा प्रतिभा कांबळे  युवा आघाडी चे अध्यक्ष राहुल दोदे, सतिश गायकवाड, ठाणे जिल्हा पदवीधर मतदार संघाचे अध्यक्ष दिपक वाघ यांचे सहकार्य लाभले तर बळीराम गायकवाड व महिला कार्यकर्त्या यांनी पहाटेपासून मेहनत घेत अन्न शिजवण्यापासून पॅकिंग पर्यंत काम पाहिले.

 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad