असंघटीत कामगांरांना अन्नधान्याचे वाटप करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
ठाणे
कोरोनाच्या माहारामारी संकटात जिल्ह्यातील सर्व मजूर, असंघटीत कामगारांसह सर्वांचेच हाल होत आहेत. यामध्ये असंघटीत कामगारांचे परिस्थिती मात्र अधिकच चिताजनक आहे. जेथे काम करावयाचे तेथेच निवारा. तेच जीवन जगणारे हे कामगार सध्या अतिशय हलाखीची स्थिती अनुभवत आहेत. कंत्राटदार, ठेकेदार वा ग्राहक यांच्या रोजंदारीवर जगणाऱ्या या कामागारांवर सद्यस्थितीत उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्य असंघटीत कामगार युनियन मार्फत कामगारांची माहिती, नाव, पत्ता व संपर्क यांची यादी देत आहोत. सदर यादी खूपच अत्यल्प आहे. अजून तीन ते चार हजार कामगारांची यादी येईल. तूर्त यादीतील गरजवतांना उपरोक्त मदत पोहोचवावी. शासनाचे हे कामगार त्यांची गंभीरस्थिती विचारांत घेऊन युनियनच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत. असंघटीत कामागांरांची सध्यस्थितीतील नोंद घेऊन जिवनावश्यक अन्नधान्याचे अथवा शिजवलेल्या अन्नाचे जेवणाचे वाटप करण्यात यावे. ही विनंती युनियनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त युनियनकडून जर काही अधिक सहकार्य अपेक्षित असल्याची कळवावे असे पत्र युनियनच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या