Top Post Ad

समता विचार प्रसारक संस्थेचा करोना लाॅकडाऊन अन्नपुर्णा प्रकल्प

समता विचार प्रसारक संस्थेचा करोना लाॅकडाऊन अन्नपुर्णा प्रकल्प



ठाणे


सध्या संपूर्ण देशात कोरोना मुळे व लॉकडाऊन मुळे, दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले आहे. समता विचार प्रसारक संस्था, तेजस्विता प्रतिष्ठान, झोमॅटो, फीडींग इन इंडिया व अन्य सहयोगी संस्था - संघटनांच्या माध्यमातून, ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, ज्यांना दोन वेळचं अन्न देखील मिळत नाही आणि ज्यांचे संपूर्ण काम बंद आहे; अशा लोकांना अन्नधान्य पुरवठा केला जातो आहे
      ठाण्यातील पातलीपाडा, धर्मवीरनगर, जय भीम नगर, मुंब्रा, चिरागनगर, कळवा, माजीवडा,आशा अनेक ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून गरजू कुटूंबाना राशनचे साहित्य वाटप अर्थात अन्न धान्य वाटप केले. त्यात १५ किलो तांदूळ, २ किलो तूरडाळ, २ किलो चणा डाळ व अर्धा किलो मसूर असे धान्य - कडधान्य दिले. हे वाटप करतांना कायद्याचे व नियमांचे पालन करीत आपण हा टप्पा पार केला. आम्ही हे काम करतांनाही अनेकांनी हाक दिली. पण आम्ही ज्याचे घरी दिव्यांग व्यक्ती आहे व ज्यांच्या घरी कमवणारी कोणी नाही व स्वतः काम करून आपला उदर निर्वाह चालवतात त्यांना प्राधान्य देत आहोत. सध्याच्या घडीला काही काम धंदा नाही.


सर्वत्र बंद आहे. काही विभागात लॉकडाऊन मुळे रस्तेही बंद व घरातून बाहेर पडणेही मुस्किल झालं आहे. अशा परिस्थितीत दिव्यांगांना अधीक त्रास होत आहे. म्हणून हे वाटप वस्त्या - वस्त्यात घरोघरी जाऊन करण्यात आले. महत्वाचं म्हणजे, या सर्वांमध्ये कुणी रिक्षा चालक, घरकाम करणारे, शिलाईकाम करणारे आदी लघु स्वयं व्यवसायिक आहेत. मदत पोहोचवली अशा अनेकांना अजून पर्यंत कोणीही मदत केलेली नाही, असे गरजुंपैकी आवर्जून सांगितले व या मदती बद्दल समता विचार प्रसारक संस्था व अन्य संघटनांचे आभार मानले. 


आत्तापर्यंत ठाण्यातील ४० लोक वस्तांमध्ये सुमारे ८७३ रेशन सेट वाटण्यात आल्याची माहिती, या प्रकल्पाचा संयोजक अजय भोसले यांनी दिली. सर्व काम करण्यात निरंजन जाधव, प्रवीण खैरालिया, प्रतीक गावडे, जतिन, रवी इसाक इ. स्वयंसेवकांनी त्या त्या ठीकाणी जाऊन आपली स्वतःची काळजी घेत, हे कार्य पार पाडले. संस्थेचे असंख्य हितचिंतक व देणगीदार यांच्या उदार देणग्यांमुळेच हे काम करणे शक्य झाले. यापुढेही ही मदत अशीच सूरू ठेवण्यासाठी आवाहन संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. ज्यांना या कामात मदत करण्याची इच्छा असेल, त्यांनी खालील नंबरवर कॉल करावा. ज्यांना आर्थिक मदत करायची असेल, ते खाली दिलेल्या संस्थेच्या बँक खात्यावर देणगी ट्रान्स्फर करू शकतात. मात्र देणगी दिल्यावर 9869984803 या नंबरवर मेसेज अवश्य पाठवा. 


बँकेचे तपशील : 


खात्याचे नाव: समता विचार प्रसारक संस्था 


बॅन्क: ठाणे भारत सहकारी बॅन्क, चेंदणी कोळीवाडा, ठाणे शाखा.


खाते नंबर: 006115000000958


आय एफ सी क्रमांक: TBSB0000006


 


- टीम करोना लाॅकडाऊन अन्नपुर्णा प्रकल्प, ठाणे.
जगदीश खैरालिया, विश्वस्त- समता विचार प्रसारक संस्था.


अधिक माहिती साठी 8108949102 या नंबरवर कधीही कॉल किंवा मेसेज करू शकता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com