Top Post Ad

अधिकाऱ्याला मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

वणवा विझवण्यासाठी चाललेल्या अधिकाऱ्याची कॉलर पकडून

जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या इसमावर व त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल 

 

   शहापूर

 

राज्यात लागू असलेल्या संचारबंदीचे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथीचे रोग प्रतिबंधक कायदयाचे उल्लंघन करून शासकीय कामात अडथळा आणून वणवा विझवण्यासाठी जाणाऱ्या  खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शशिकांत देशमुख यांची कॉलर पकडून त्यांना शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या  एका इसमावर व त्याचे साथीदारांवर मंगळवारी सायंकाळी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

सोमवार १३ एप्रिल रात्री खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शशिकांत देशमुख व सहकारी कर्मचारी वनकार्यालयात कर्तव्यावर असताना रात्री ८.३० वाजता मोखावणे गावच्या हद्दीतील जंगलात वणवा पेटला असे सजताच खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख, वनरक्षक पन्नालाल दिनकर बेलदार, वाचमन उत्तम काळू चौरे, दत्तू वाघ, निलेश धापटे, रघुनाथ वारे वणवा विझवण्याचे साहित्य घेऊन मोखावणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असतांना गाडीच्या उजेडात चार इसम बसलेले दिसले. वणवा जोरात लागल्याने गाडीतील वाचमन यांना आग विझवण्याचे साहित्य घेऊन आग विझविण्यासाठी पुढे पाठवून दिले. व देशमुख व बेलदार यांनी सदर इसमाकडे विचारपूस करण्यासाठी गेले.

 

एवढया रात्री जंगलात का बसले असे विचारले असता दिलीप गणपत घागस याने तुम्ही आम्हाला विचारणारे कोण तुम्ही पोलीस आहात काय   त्यांना देशमुख यांनी सांगितले जंगलात वणवा लागला आहे तुम्ही तेथे बसू नका. त्यांचे जवळ बीयर बाटली व सिगारेट पेटवलेली दिसली. तेव्हा वनाधिकारी याना त्यांची खात्री झाली की या चौघांनी मिळून जंगलात वणवा लावलेला आहे. आरोपींना जंगलात वणवा का लावला असे विचारले असता  तेथे मोखावणे गावातील  दिलीप गणपत घागस, सुधीर देवराम भोईर, दिलीप वामन भोईर, वैभव किसन गगे सर्व राहणार मोखावणे यांनी प्रशांत देशमुख हे सरकारी काम करत असताना सरकारी कामात अडथळा आणून आरोपींनी जंगलात वणवा लावून , जंगलात वणवा का लावला असे विचारले असता दिलीप गणपत घागस याने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख हे सरकारी गणवेशात असतांना त्यांची कॉलर पकडून मादरचोद तुम्ही मला सांगणारे कोण अशी शिवी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच सुधीर देवराम भोईर, दिलीप वामन भोईर, वैभव किसन गगे यांनी वनरक्षक पन्नालाल बेलदार यास शिवीगाळ केली. नंतर ते त्यांच्या दोन मोटार सायकलवरून मोखावणे  गावच्यादिशेने पळून गेले  अशी फिर्याद सरकारतर्फे प्रशांत देशमुख यांनी दिली असता 

आरोपी दिलीप गणपत घागस, सुधीर देवराम भोईर, दिलीप वामन भोईर, वैभव किसन गगे  यांचेवर भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमान्वये कलम १८८, ३५३,५०४, ५०६, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम२००५ कलम ५१(ब) तसेच महाराष्ट्र कोविड-१९ विनियमन२०२० कलम ११ नुसार मंगळवारी सायंकाळी ४.२९ वाजता कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केशव भागवत केंद्रे करीत आहेत.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com