Top Post Ad

सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-19 तपासणी केंद्रांची मान्यता 

सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-19 तपासणी केंद्रांची मान्यता 


मुंबई


कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खाजगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत  येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड-19 तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला होता त्यानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी  त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठविण्या बाबत सुचित करण्यात आले होते. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात अशी तपासणी केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या चाचणी केंद्रासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, साधन सामग्री तसेच अन्य बाबी संबधित जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने व शिफारशीनुसार करण्यात याव्यात असे आदेशही देण्यात आले आहेत.
 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई, जि. बीड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,बारामती, जि. पुणे, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गोंदिया या महाविद्यालयांचा यात समावेश आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये  कोविड-19 तपासणी केंद्र स्थापित करण्याच्या दृष्टीने विहित करण्यात आलेली मानके, कार्यपद्धती आणि अन्य बाबीची पूर्तता करण्याची जबाबदारी महाविद्यालयाच्या प्रमुखावर टाकण्यात आली आहे.   बाधित रुग्णांची तपासणी स्थानिक स्तरावर करणे आणि अशा रुग्णावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होणार असल्याने या तपासणी केंद्रांची निर्मिती लवकरात लवकर करण्यात यावी असे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com