कोरोनाबाबत जनजागृतीसाठी 'ट्रेल'चा पुढाकार

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी 'ट्रेल'चा पुढाकार


~ अचूक माहितीसाठी देशभरातील तज्ज्ञ डॉक्टर्सना आणले एकत्र ~


~ कोव्हिड-१९ चा जन्म, लक्षणे, प्रसार रोखण्यासंदर्भात देत आहेत माहिती ~


  


मुंबई


विविध समाजमाध्यमांतून कोरोना विषाणूसंदर्भात ब-याचदा चुकीची माहिती पसरवली जाते ज्याद्वारे लोकांमध्ये भीती आणि अनिश्चितता वाढत आहे. या अफवांच्या स्थितीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम यांनी ‘इन्फोडेमिक’ असा योग्य शब्दप्रयोग केला आहे. अशावेळी विज्ञान आधारीत फॅक्टच्या माध्यमातून इन्फोडेमिकवर मात करत लोकांपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने 'ट्रेल' या समाज आधारित मंचाने भारतातील अग्रगण्य डॉक्टरांची निवड केली आहे. हे डॉक्टर स्थानिक भाषिक प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये व्लॉग्सचा (Vlogs) वापर करत आहेत.


कोव्हिड-१९या संकटाविषयी निगडीत विविध विषयांवर डॉक्टर्स मार्गदर्शन करत आहेत. या विषयांमध्ये कोव्हिड-१९ चा जन्म, लक्षणे, याचा प्रसार कसा थांबवायचा, आ‌वश्यक खबरदारी आणि सामजाक अंतराचे महत्त्व आदींचा समावेश आहे. डॉक्टर आणि त्यांचे तज्ञ मत याद्वारे मिळालेले ज्ञान आणि विश्वासदर्शक घटक हे सध्याच्या चिंताजनक व भीतीदायी वातावरणात गेमचेंजर ठरत आहेत. हे व्लॉग्स विश्वसनीय तर आहेत, तसेच ते आकर्षक असून विविध भाषांमधील प्रेक्षकांना समजून घेण्यासाठी सोपे आहेत.


या अभूतपूर्व आणि विचित्र परिस्थितीत, आपण जे पाहतो आणि वाचतो, त्यावर चटकन विश्वास ठेवणे सोपे आहे. त्यामुळे आपण निराधार माहितीला बळी पडतो. त्यामुळे नाहक चिंतांना सामोरे जावे लागते.अशा स्थितीत परिस्थितीचे पहिले प्रत्यक्षदर्शी असलेल्या डॉक्टरांनी सांगितलेली तथ्ये ही काळाची गरज आहे. सुदैवाने, आपल्या देशातील डॉक्टर्स हे रोग आणि चुकीच्या माहितीला पराभूत करण्यासाठी वचनबद्ध आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA