Trending

6/recent/ticker-posts

त्यांच्याविरुद्ध साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कडक कारवाई

करोना संदिग्ध म्हणून डॉक्टर-नर्सेस घरातून बेदखल करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कडक कारवाईमुंबई (२६-३-२०२०)सध्या कोरोना विषाणु साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असे असतानाही काही घरमालक, हाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घर खाली करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे पूर्णतः चुकीचे असून संबंधीत घरमालक, हाऊसिंग सोसायट्या यांनी असे करु नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. एखादे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. भाड्याच्या घरात राहणारे डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


----------------------------------


 


 


करोना संदिग्ध म्हणून डॉक्टर-नर्सेस आपल्याच घरातून बेदखल
 'एम्स'च्या 'रेसिडन्ट डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन'नं पाठवले गृहमंत्रींना पत्र नवी दिल्ली : 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर २२ मार्च रोजी सायंकाळी अनेकांनी कोरोनाशी सामना करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, सहाय्यक, सफाई कर्मचारी, आदींना 'करोना कमांडर्स' आणि 'देशाची शक्ती' म्हणत त्यांच्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या होत्या. परंतु, समाजातील काही लोकांमुळे या कोरोना कमांडर्सना अडचणींना तोंड द्यावं लागतं असल्याची माहिती मिळत आहे.  करोना व्हायरसच्या भयंकर परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांना आणि नर्सेसना करोनासोबतच एका वेगळ्याच संकटाला तोंड द्यावं लागतंय. कठीण परिस्थितीतही केवळ कर्तव्य म्हणून अनेक डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, साफ-सफाई कर्मचारी असे अनेक जण घराबाहेर पडून आपली जबाबदारी पार पाडत आहे. अशा अनेकांना ते राहत असलेल्या कॉलनीत किंवा घरातच येण्यास स्थानिक नागरिकांकडून मज्जाव होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
आपल्या घरात भाड्यानं राहणाऱ्या डॉक्टर, नर्सेसवर त्यांचे घरमालक घर सोडून जाण्यासाठी दबाव टाकत आहेत, असं समोर आलं. याची तक्रार 'एम्स'च्या डॉक्टरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली. 'घरमालक घर सोडण्यासाठी दबाव टाकत आहेत. केवळ डॉक्टर नाही तर नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफसोबतही असा दुर्व्यवहार सुरू आहे' असं 'एम्स'च्या 'रेसिडन्ट डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन'नं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं. जवळपासचे लोक त्यांच्याकडे करोना संदिग्ध म्हणून पाहत आहेत.


Post a Comment

0 Comments