Trending

6/recent/ticker-posts

कल्याणहून राजस्थानला जाण्यासाठी चक्क दुधाच्या टँकरमधून प्रवास

राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबवावे -  राज्यपालांचे निर्देशकल्याणहून राजस्थानला जाण्यासाठी चक्क दुधाच्या टँकरमधून प्रवास


पालघर


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. परंतु शहरात अडकून पडलेली परराज्यातील मोलमजुरी करणारी लोकं पायी किंवा मिळेल त्या वाहनाने गावी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. संचारबंदी असल्याने दुधाच्या टँकरमधून चक्क कामगारांना गावी घेवून जात असल्याचा प्रकार तलासरीत उघड झाला आहे. कल्याणहून राजस्थानकडे दुधाच्या टँकमध्ये कामगारांना बसवून घेवून जात असताना तपासणी दरम्यान तलासरी पोलिसांनी कारवाई केली आहे.


कोरोनासाठी सुरू असलेली संचारबंदीमुळे आपल्या गावाकडे जाण्यासाठी कामगार अनेक युक्त्या लढवत आहेत. कल्याणहून राजस्थानला जाण्यासाठी 12 कामगारांनी चक्क दुधाच्या टँकरमधून प्रवास करताना पालघर जिल्ह्यात पोलिसांनी कामगार आणि टँकर चालकाला ताब्यात घेतलं आहे. कल्याणहून राजस्थानकडे जाण्यासाठी निघालेले वाहन तलासरी पोलिसांनी  तपासणीसाठी थांबवले होते.  वाहनांची तपासणी केली असता त्यामधून कोंबुन भरलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आलं. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असून राज्याच्या सीमा सील असल्याने टँकरचालक नवीन शक्कल लढवताना दिसत आहेत. तलासरी पोलिसांनी टँकरसह चालक आणि कामगारांना ताब्यात घेतलं आहे.


 


राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबवावे-  राज्यपालांचे निर्देश


मुंबई :


कोरोनाच्या भीतीने आणि रोजगार मिळत नसल्याने अनेक नागरिक राज्यांतर्गत तसेच राज्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. खाजगी गाड्यांमध्ये नागरिक जीव धोक्यात घालून आपलं गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक लोक पायी देखील आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व सहा विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली व प्रत्येक विभागातील करोना व्हायरस संक्रमण व लोकांचे  स्थलांतर याबाबत माहिती घेतली. करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करीत असलेल्या लोकांना ते जेथे असतील तेथे थांबविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी विभागीय आयुक्तांना केली.सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसेच अशासकीय संस्था करीतअसलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असे राज्यपालांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments