एक पोळी गरिबांसाठी .....होळीनिमित्त पुरणपोळी वाटप.
राजे प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम.
पनवेल
होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या व निराधार लोकांच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच आजच्या महागाईच्या दुनियेत प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी अशी संकल्पना राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांना सुचली न त्यानुसार गेली ३ वर्षापासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम त्यांच्यावतीने केले जाते.
होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान पनवेलच्या वतीने यंदा पनवेल शहरामधील पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील गोर - गरिबांना व गरजूंना तसेच निराधार लोकांना पुरणपोळीचे वाटप केले गेले. होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रम देखील होत असतात. मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते. तर दुसरीकडे अनेक गोर गरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशीच झोपावे लागते. याची जाणीव ठेवून तसेच समाजातील प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी या चांगल्या उद्देशाने राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार एक पोळी गरिबांसाठी उपक्रमांतर्गत पुरणपोळ्या वाटप करण्यात आले.
या उपक्रमास पनवेलकरांनी चांगला प्रतिसाद दिला पनवेलमधील गावदेवी मंडळे, सामाजिक संस्था, सोसायट्या यांनी आपल्या होळीमध्ये प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता ती आमच्याकडे दिली व आम्ही ती गरिबांपर्यंत पोहचवली त्यामुळे यावेळी देखील हा उपक्रम यशस्वी झाला व पुरणपोळ्या आमच्या संस्थेस दिल्याबद्दल गावदेवी मित्र मंडळ व प्रसाद सोनावणे यांचे तसेच राजे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घरातून पुरणपोळ्या आणल्याबद्दल आभार मानले व असे समाजोपयोगी उपक्रम आम्ही नेहमी राबवू असे केवल महाडिक यांनी सांगितले यावेळी सदाशिव मोरे, गंगाराम शिंदे, सचिन गणेचारी, नितीन गणेचारी, अनिकेत अंकुश, विजय शिंदे, राजू मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या