घरकुलसाठी अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
पालघर:
केंद्र शासन व राज्यशासन यांच्या मार्फत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. ज्या कुटुंबाना स्वत:चे हक्काचे घर नसेल अशा कुटुंबानी केंद्र शासन किंवा राज्यशासन यांच्याकडे घरकुल साठी अर्ज करावेत असे हि आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले. नियोजन भवन येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने ठाण्यातील नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय उपयोगी साहित्य देऊन गौरव करण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, अपर जिल्हाधिकारी दिलीप गट्टे, उपजिल्हाधिकारी संदिप पवार, जिल्हा नियोजन अधिकारी गोपाल भारती, सामाजिक कार्यकर्त्यां कुसूमताई गोपले आदि मान्यवर तसेच नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवत आहे या योजनेचा लाभ मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मातंग समाजातील होतकरू व सुरक्षित बेरोजगार युवकांसाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत स्वयंराजगारांसाठी 7 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहे. तसेच केंद्र शासनाच्या मुद्रा बँक कर्ज योजनेमार्फत स्वयरोजगारासाठी, उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ समाजातील गरजू तरूणांनी घेऊन उद्योग स्थापन करावेत. या स्थापन केलेल्या उद्योगामार्फत रोजगार निर्मिती सुद्धा होणार असून या माध्यमातून संपूर्ण समाजाचा विकास साधता येईल असे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या