Top Post Ad

केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्रीडा वैद्यकीय विभाग

क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय स्थित केंद्राच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धती आणि पुनर्वसन सेवा उपलब्ध होणार आहेत. अशा स्वरूपातील सुविधा उपलब्ध करून देणारे शासकीय रुग्णालयांमधील केईएम हे मुंबईतील पहिले रुग्णालय ठरले आहे. क्रीडा क्षेत्राला उत्तमोत्तम उपलब्ध करून देण्यासाठी या केंद्राचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे  गौरवोद्गार  मुंबई   महानगरपालिका आयुक्त   भूषण गगराणी यांनी काढले. 


केईएम रुग्णालयात क्रीडा वैद्यकीय विभाग हा एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण क्षमतेने याठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही ते म्हणाले. परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय येथे क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी उपचार आणि पुनर्वसन केंद्र (Sports Injury and Rehabilitation Centre) चे लोकार्पण बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांच्या हस्ते आज दिनांक १४ डिसेंबर  करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य)  शरद उघडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, अस्थिरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मोहन देसाई, बाळकृष्ण इंडस्ट्रीच्या विजयालक्ष्मी पोद्दार, अरविंद पोद्दार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रासाठी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित केंद्राची निर्मिती केल्याबद्दल बृहन्मुंंबई महानगरपालिका आयुक्त यांनी केईएम रुग्णालयाच्या क्रीडा वैद्यकीय विभागाच्या चमूचे कौतुक केले. क्रीडा क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धतीची निर्मिती करण्यासाठी आर्थिक सहाय्य केल्याबद्दल बालकृष्ण इंडस्ट्रीचे देखील श्री. गगराणी यांनी आभार मानले. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून क्रीडापटूंसाठी यास्वरूपाचे योगदान म्हणजे खासगी क्षेत्राची क्रीडा क्षेत्रासाठी असणारी वचनबद्धता आहे. बालकृष्ण इंडस्ट्रीने केईएम रुग्णालयाची निवड करणे, ही अतिशय आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले. खासगी क्षेत्राची क्रीडा क्षेत्रासाठी योगदान करण्याची तयारी ही अतिशय महत्वाची बाब आहे. मुंबईसारख्या क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाट्यामुळे अतिशय गरजेची असणारी क्रीडापटूंसाठीची ही सुविधा निर्माण करणे शक्य झाले आहे. ज्याचा फायदा हा केईएम रुग्णालयाची देशपातळीवरील क्रमवारी उंचावण्यासाठीही निश्चितच होईल, असा विश्वास  गगराणी यांनी व्यक्त केला.  भारतात ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेची तयारी करण्याचे आवाहन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अशावेळी मुंबईसारख्या महानगरात क्रीडापटूंसाठी असे केंद्र उपलब्ध असणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. या केंद्रात उपचार घेऊन पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंनाही सेवासुविधांचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास श्री. गगराणी यांनी व्यक्त केला. खेळताना अथवा व्यायाम करताना दुखापतग्रस्त झालो तर मलाही याठिकाणी उपचार घ्यायला आवडतील, अशी मिश्किल टिप्पणीही  गगराणी यांनी याप्रसंगी केली.

सर्व प्रकारच्या दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी केंद्राच्या ठिकाणी विविध स्वरूपाची उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. क्रीडापटूंच्या उपचारासाठी आवश्यक असणारे आर्थोस्कोपी शल्यचिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, बायोफिजिसिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ अशा स्वरूपाचे सर्व उपचार एकाच छत्राखाली उपलब्ध असणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुरक्षेची सुविधा उपलब्ध असणाऱ्या या केंद्राच्या ठिकाणी सर्व वयोगटाच्या रुग्णांसाठी उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी २० रुग्णशय्या असणारा विशेष कक्षदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच क्रीडापटूंना आवश्यक असणाऱ्या टेकार थेरपी, अल्ट्रासोनिक थेरपी, इंटरफेरेन्शिअल थेरपी, शॉकवेेव्ह थेरपी, आईस एण्ड हिट थेरपी आदी उपचार पद्धतीदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

  • *उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या ठिकाणी सुविधा :* 
  • - अंडरवॉटर ट्रेडमिल
  • - डी वॉल आणि वॉकर व्ह्यूव्ह मशीन
  • - झिरो ग्रॅव्हिटी ट्रेडमिल
  • - एरोलॅप आणि डायनेलॅब 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com