Top Post Ad

घराणेशाही आणि लोचट कार्यकर्ते.

आपल्या देशात घराणेशाहीला इतका उत आला आहे की तो थांबत्ता, थांबत नाही, आणि तो थांबणार तरी कसा, ह्याचे कारण म्हणजे लोचट कार्यकर्ते, नेत्यांच्या, मंत्र्यांच्या मागे पुढे करणारे, हाजी हाजी करणारे, त्यांचे पायावर लोटांगण घालणारया कार्यकर्त्यांची काही कमी नाही, हजारो असे कार्यकरते आहेत ज्यांनी आपले इमान सदर राज्यकारणयांना विकुंन मोकळे झाले आहेत, असे मोजकेच कार्यकर्ते आहेत जे प्रमाणीकपणे जनतेच्या समस्यांचे निवारण करतात, समाजसेवेला वाहून घेतात, पण दुर्दैवाने इतर कार्यकर्ते मात्र राजकारणाचा धंदा करून बसले आहेत, फक्त पैसा कसा कमावता येईल ह्याकडे त्यांचे लक्ष असते, बाकी राजकारणाशी त्यांचे काही देणे घेणे नाही, तसेच नेत्यांची मर्जी संपादन करण्यात ते पटाईत असतात, लागेल ती अडलेली पडलेली कामे करत असतात, मग सतरंज्या उचलण्या पासून ते ब्यानर, पोस्टर, भाड्याची माणसे सभेला आण्यापासून ते बेडरूम पर्यंतची गल्लीच काम करण्यात ते मागचा पुढचा विचारही करीत नाही, त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना पक्षांमध्ये मोठ्या पदावर घेतले जाते अथवा एखादी शासकीय कमिटी, किवा अन्य फायदेशीर गोष्टी दिल्या जातात, अश्या गोष्टींचे वाईट वाटते ते म्हणजे ते आपल्या स्वाभिमानाचा कधीच विचार करीत नाही,

 ह्याच गोष्टींचा फायदा घेऊन राजकीय नेते आपली पोळी भाजत असतात, जनतेला देखील त्याचे काहीच पडलेले नाही, आपल्या मतदानाचा हक्क बजावला म्हणजे झाले, प्रतिनिधी कसाही असो, मग तो गुन्हेगार असो किंवा अनपड असो, त्याला जाब विचारण्याची अथवा त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत कोणीही करत नाही, त्याचाच फायदा घेऊन राज्यकर्त्यांनी आपला घराणेशाहीचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात दंग झालेले दिसतातहेत, निवडणुकीला स्वतातर उभं रहायाचेच त्यातून बायको-मुलांना तसेच नातेवाईकांना देखील उभं करायचं, ऐशो आरामात जाणारया राज्यकर्त्यांनी मात्र कार्यकर्त्यांना देशोधडीला लावले, कार्यकर्त्यांनी फक्त आणि फक्त कार्यच करत रहायचे, त्यांच्या आदेशांचे पालन करून स्वताची डोकी फोडुन घ्यायची, अंगावर केसेस लादुन घ्यायाच्या, कोर्टाच्या फेरया मारात रहायच्या, स्वताचा पैसा खर्च करायचा, घरच्यांना विनाकारण त्रास भोगायला लावायचा आणि हे सगळे कुणासाठी तर फक्त आपल्या नेत्यांची मर्जी संपादन करण्यासाठी, नेते मात्र आपल्या चरी खाऊन पिऊन सुखी रहातात आणि कार्यकर्ते मात्र त्यांच्या आदेशांचे पालन करून आपलं आयुष्य पणाला लावतात, दुःख एकाच गोष्टीचे होते ते म्हणजे कार्यकर्त्यांना ह्या गोष्टींची जाणीव का होत नाही, काय चांगले काय वाईट ह्यातला त्यांना फरक कळत नाही, ह्याला म्हणावे तरी काय दुर्दैव.? आजच्या घडीला अशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत पण त्याचा काही उपयोग झालेला नाही, 

अनेकांनी राजकारण्यांच्या नादाला लागून स्वताचे जिवन तसेच संसार उद्धवस्त करून घेतले आहेत, असे असताना देखील राज्यकर्त्यांच्या अमीषाला हे का बळी पडतात हा एक मोठा प्रश्न आहे. 7 आज पर्यंताचा इतिहास हे सांगत आला आहे की राज्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या जिवावर घराणेशाही चालवली, त्यांच्या जिवावर ते मोठे झाले, त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून स्वताचा स्वार्थ साधला, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असुनही आपण डोळेझाक का करीत आहोत.? निदान आता तरी डोळे उघडा, घराणेशाही विरोधात आवाज उठया, बस झाली ही घराणेशाही, ही घराणेशाही आता थांबायलाच हवी, आपल्या मधले अनेक चांगले कार्य करणारे लोक आहेत, अशाच लोकांना जनतेने एक मताने ठरवुन निवडून दिले तर घराणेशाही नेस्तनाबूत झाल्या शिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे, नेत्यांचे एकच म्हणने असते ते म्हणजे, तुम लड़ते रहो हम कपडा संभालते है. भरकटलेल्या कार्यकर्त्यांनो निदान आता तरी भानात या. समाज कार्य करण्यास काहीच हरकत नाही, कुठल्याही पक्षात जा, जनतेची कामे करा, त्यांचे आशीर्वाद ध्या, पण घाणेरड्या राजकारणापासून दूर रहा, एवढीच आपल्याला कळकळीची विनंती ह्या लेखातून सर्व कार्यकर्त्यांना तसेच जनतेला करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com