शिक्षणाचा आईचा धोव, हा चित्रपट प्रत्येक पालक वर्गाने पहावा आणि त्यातुन बोध घ्यावा, हया चित्रपटाने शिक्षण व क्रीडा प्रेमी असलेल्या एका मुलाच्या व बापाच्या जिवनावर लक्ष केंद्रीत केले खरे पण खऱ्या अर्थाने मुलांची कोंडी शिक्षाकां पासून कशी केली जाते, त्यांच्या समस्या, शाळतले वातावरण, मित्रांन मधली धूसपूस, अश्या अनेक गोष्टी आहेत जे ह्या विद्यार्थ्यांना पोशक नाही हे वास्तव आहे, आपल्या मुलगा/मुलगी शिकावी ह्या हेतूने त्यांना शाळेत पाठवले जाते, शाळेतील घडामोडी शिक्षकांनपासून कधी लपत नाही, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे शिक्षकाचे काम असते, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून योग्य काय आहे किंवा नाही ह्याची जाणीव करून दिली तर ते चांगल्या प्रकारे त्याची अंमलबजावणी करू शकतात, तसेच शिक्षकांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना एकत्रित आणण्याचे काम केले तर त्यांच्या मधला दुरावा दूर होऊन मैत्रीत रूपांतर होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांच्या मध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण होण्यास वेळ लागत नाही,
खरे तर शाळेतुन मिळालेलं संस्कार हे त्यांच्या जिवनामध्ये फार मोठा बदल घडवू शकतो त्यासाठी शिक्षकांमध्ये तशी मानसिकता प्राप्त होणे गरजेचे आहे, कधी काळी शिक्षकांची गैर मानसिकता घातक ठरू शकते हे कटू सत्य आहे, मुलांमध्ये भेदभाव करणे त्यांना कमी लेखणे, गरीब मुलांनवर दुर्लक्ष करणे अश्या अनेक गोष्टी परिणामकारक ठरू शकतात त्याचे प्रत्यंतर आत्महत्यांच्या स्वरूपात दिसुन येते हे सध्याचे वास्तव आहे. सर्वच मुले हुशार असतात असे काही नाही, जो तो आपल्या परीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत असतो, काहींना त्याची आवडही नसते मात्र ती आवड निर्माण करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असते हे वास्तव आहे, पण ते अवघड काम शिक्षकांनी करणे गरजेचे आहे, त्यांना जर का वार्यावर सोडून दिले तर ते काहीच करू शकणार नाहीत, त्यांचा द्वेष करणे, इतर मुलांसमोर त्यांचा पानउतारा करणे, त्यांना शिक्षा देणे, टोचुन बोलणे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या जिवनात हानिकारक ठरू शकतात ही गोष्ट शिक्षकांच्या ध्यानी असणे फार गरजेचे आहे,आजच्या घडीला देशांमध्ये अनेक विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत, कंपास बॉक्स नाही म्हणून आत्महत्या केल्याचे वृत्त आपल्या डोळ्यासमोरचे जिवंत उदाहरण आहे, अशी अनेक उदाहरणे रोजच्या रोज आपल्याला ऐकायला, बघायला मिळतात, ज्या शिक्षकांना विद्यार्थ्यांवर लक्ष देता येत नाही, पोषक वातावरण निर्माण करता येत नाही अशांना सरळ घरचा आहेर देणे योग्य होईल, सध्या शिक्षण म्हणजे धंदा झाला आहे, शिक्षण इतके महाग झाले आहे कि विचारता सोय नाही, फक्त नावासाठी शिक्षण संस्था स्थापना करायच्या आणि पैसा कमावायचा हा धंदा झाला आहे, सध्याची स्थिती पाहता पालकांचा शिक्षण समूहावरचा विश्वास उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे, विश्वासाला तडा गेल्याची अनेक उदाहरणे शिक्षण समूहांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मधुन दिसु लागल्या आहेत, पालक वर्ग आपली सोन्या सारखी मुले गमावून बसली आहेत, घरचा राग विद्यार्थ्यांवर काढायचा, वाटेल तशी शिक्षा ठोठुन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करायचे अश्या तर्हेची विक्रुती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे, ते मोडीत काढायचे काम आता प्रत्येक राज्यातील सरकारने हाती घेणे गरजेचे आहे अन्यथा गरिब विद्यार्थी फुकट मारले जातील ह्यात काही वाद नाही, तसेच पालकांनी आपल्या मुलांमध्ये काही त्रासदायक बदल दिसू लागला तर त्याची विचारपूस करून योग्य तो निर्णय द्यावा, त्याला त्रास होण्यासारखे काहीही करू नका, हवे झाल्यास त्यांची शाळा बदला पण त्यांच्या आत्महत्या थांबवा.
सोनाली स्वप्निल म्हात्रे.

0 टिप्पण्या