मौजी खराडी सर्वे नं-३०/१/१ मध्ये दि. २३/०४/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आबेडकर वसाहतीस SRA च्या अंमलबजावणीसाठी आग लावण्यात आली, या मध्ये १०० मागासवर्गीय गरीब कुटुंबाच्या झोपड्या जळून खाक झाल्या, व यामध्ये बशीर मुजावर शेख यांचा मृत्यू झाला आहे. आजही सदर मागासवर्गीय कुटुंबे उपड्यावर, हालाखीचे जीवन जगत आहे, या संदर्भात वसाहतीमधील सर्व ५८४ कुटुंबांना पाच सर्वे नं. मधील मोकळ्या जागेत १ गुंठा मालकी हक्क मिळण्यासाठी शासन निर्णय क्र. एल ई एन: १०९९/प्र. क्र. २०/ज मंत्रालय मुंबई-३२ दि. २८ सप्टेंबर १९९९ शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करणे, बोगस SRA रद्द करणे, SRA व्हावं या साठी सेवा व शर्तीचा भंग करून बेकायदा निर्णय घेणाच्या सहभागी सर्व अधिका-याची माधील ३ वर्षाची संपत्तीची चौकशी करणे, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करणे, पोलिसांची आंदोलन मोडण्यासाठी आंदोलकांना होणारी बेकायदा अटक व दादागिरी त्वरित थांबवणे, जळीतग्रस्तांना नुकसान भरपाई देणे, SRA हवा या साठी १० हजार कोटीच्या भ्रष्टाचारा साठी पाटील बिल्डर व महिला भाजपा शहराध्यक्ष तसेच सर्व नेत्यांचे आर्थिक गुन्हा शाखेकडून चौकशी करणे तसेच या सर्वापासून जीवारा धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळणे, ई. प्रमुख मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याकरिता ५८४ कुटुंबाने मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
या संदर्भात अखिल मांजराईनगर नागरिक कृति समितीचे राजेंद्र गोविंद साळवे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत खराडी पुणे या ठिकाणी दि. ३०/०४/२०२५ पासुन दररोज सकाळी ११ ते १२ पर्यंत १ तास बेमुदत धरणे आंदोलन गेली ६० दिवस शांततेत चालु आहे. तसेच २५/०१/२०२५ रोजी खराडी ते वर्षा बंगला पायी पदयात्रा मा. मुख्यमंत्री, म. रा. मंत्रालय मुंबई-३२, यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात- १) मा. जिल्हाधिकारी पुणे, २) मा. महापालिका आयुक्त पुणे, ३) मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, SRA पुणे, ४) मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, म्हाडा पुणे, ५) मा. पोलिस आयुक्त, पुणे शहर पोलीस, पुणे, ई. अधिकारी वर्गाची संयुक्त बैठक आयोजीत करणे या मुख्य मागणी साठी काढलेली होती. परंतु पोलिसांनी आझाद मैदानात सदरचा मोर्चा अडविला तसेच शिष्टमंडळासह मा. हनुमंत आरगुंडे उपसचिव मुख्यमंत्री कार्यालय मुंबई यांची भेट झाली. त्यावेळी ८ दिवसात सदरची बैठक मंत्रालयात आयोजित करतो असे आश्वासन दिले. परंतु आजपर्यंत वेळोवेळी अर्ज, विनंती करूनही केवळ स्थानिक दोषी महिला भाजपा शहराध्यक्ष यांना वाचविण्यासाठी व १० हजार कोटीच्या भ्रष्टाचारा साठी ही बैठक आयोजित केलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने ८/०७/२०२५ रोजी मंगळवारी दुपारी २:०० वा. मंत्रालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती मधील ५८४ मागासवर्गीय कुटुंबे मंत्रालयात संबंधित अधिकारी वर्गाची बैठक आयोजित करणे या मुख्य मागणीसाठी सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत. आमच्या जीवास काही बरेवाईट झाल्यास संबंधिक दोषी अधिकारी, बिल्डर, महिला भाजपा शहराध्यक्ष तसेच इतर सहभागी सर्वावर आत्महत्येस प्रवृत्त केले प्रकरणी तसेच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे असेही जाहिर करण्यात आले.
0 टिप्पण्या